मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक प्रचंड चर्चेत आहेत. सर्वत्र यांच्या विषयीच चर्चा होत आहे. येणाऱ्या बातम्या या सानिया आणि शोएबच्या चाहत्यांची चिंता वाढवणाऱ्या नक्कीच आहेत. सानिया आणि शोएब लवकरच घटस्फोट घेऊन विभक्त होणार असल्याचे कळते आहे, याची माहिती स्वत: यांच्या अत्यंत जवळच्या मित्राने दिलीये. इतकेच नाही तर सतत या चर्चा सुरू असताना यावर सानिया आणि शोएबने माैन बाळगले आहे. यामुळे शंकेला वाव मिळतंय.
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचे लग्न टिकावे, अशी प्रार्थना आता चाहते करताना दिसत आहेत. नुकताच सानिया मिर्झाने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोमध्ये सानिया गार्डनमध्ये चालताना दिसत आहे. सानियाच्या या फोटोवर कमेंट करत चाहते अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत. एका चाहत्यांने विचारले की, तुम्ही खरोखरच शोएब मलिकसोबत घरस्फोट घेत आहात का?
सानिया मिर्झाने शेअर केलेल्या फोटोवर दुसरा चाहता म्हणाला की, तुमच्या दोघांपैकी कोणी आम्हाला सांगणार आहे का? की खरोखरच तुमचा घटस्फोट होतो आहे ते? एका पाकिस्तानी चाहत्याने कमेंट करत म्हटले की, तुमचा आणि शोएबचा घरस्फोट होऊ नये आणि या सर्व अफवा निघाव्यात, ही प्रार्थना करतो. सानियाच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.