मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वी तापसी पन्नू हिने नेपोटिझमवर मोठे भाष्य केले होते. तापसी पन्नू हिचे नेपोटिझमवरील (Nepotism) विचार ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. इतकेच नाहीतर यादरम्यान अनेकांनी थेट तापसी पन्नू हिच्यावर टिका करण्यास सुरूवात केली. काही दिवसांपूर्वी तापसी पन्नू ही करण जोहर (Karan Johar) याच्या शोमध्ये पोहचली होती. यावेळी तापसी पन्नू ही तिच्या सेक्स लाईफबद्दल देखील बोलताना दिसली. तापसी पन्नू हिचे हे बोलणे ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. तापसी पन्नू ही कायमच चर्चेत राहणारी बाॅलिवूड अभिनेत्री आहे.
नुकताच तापसी पन्नू हिचे काही फोटो हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. अनेकांनी या फोटोनंतर तापसी पन्नू हिच्यावर प्रश्नांचा भडिमार केलाय. इतकेच नाहीतर अनेकांनी तापसी पन्नू हिचे काैतुक करण्यासही सुरूवात केलीये.
तापसी पन्नू हिने जिम ट्रेनरसोबत हे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये तापसी पन्नू हिचे सिक्स पॅक दिसत आहेत. तापसी पन्नू हिचे हे सिक्स पॅक पाहून अनेकांना धक्का बसलाय. हे सिक्स पॅक बनवण्यासाठी तापसी पन्नू हिने खूप जास्त मेहनत घेतलीये. आगामी चित्रपटासाठी तापसी पन्नू हिने हे सिक्स पॅक तयार केल्याचे बोलले जात आहे.
तापसी पन्नू हिने तिचे हे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तापसी पन्नू हिचे हे फोटो पाहून एका युजर्सने लिहिले की, असे सिक्स पॅक तयार करून तुला टायगर श्रॉफ व्हायचे आहे का? दुसऱ्याने लिहिले की, बहुतेक तापसी पन्नू हिने तिच्या आगामी चित्रपटासाठी सिक्स पॅक तयार केले आहेत. तिसऱ्याने लिहिले की, जबरदस्त लूक आहे तुझा तापसी पन्नू
काही दिवसांपूर्वीच तापसी पन्नू हिने डंकी चित्रपटाचे शूटिंग केले आहे. तापसी पन्नू हिचा डंकी हा चित्रपट यंदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच तापसी पन्नू ही शाहरुख खान याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. शाहरुख खान याने डंकी चित्रपटानंतर लगेचच जवान चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केलीये. आता शाहरुख खान आणि तापसी पन्नू यांची जोडी काय धमाका करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.