मुंबई : बाॅलिवूड अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. लवकरच ऋतिक रोशन याच्या वाॅर 2 चित्रपटाचे काम सुरू केले जाणार आहे. सतत या चित्रपटाबद्दल काही अपडेट पुढे येताना दिसत आहेत. ऋतिक रोशन याच्या या चित्रपटासाठी अयान मुखर्जी (Ayan Mukerji) यानेही तगडी फिस घेतली आहे. पुढच्या महिन्यात या चित्रपटाचे काम सुरू केले जाणार आहे. ऋतिक रोशन हा त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ऋतिक रोशन हा सबा आझाद (Saba Azad) हिला डेट करतोय. विशेष म्हणजे हे दोघे कायमच विदेशामध्येही फिरायला जातात.
नवीन वर्षाचे स्वागत सबा आझाद आणि आपल्या मुलांसोबत करताना ऋतिक रोशन हा दिसला होता. हे खास पार्टी करण्यासाठी विदेशातही केले होते. काही दिवसांपूर्वी ऋतिक रोशन याने सबा आझाद हिच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये सबा आझाद लंडनमध्ये एका बाकावर बसलेली दिसत होती.
काही दिवसांपूर्वीच ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांनी खास फोटोशूट केले आहे. इतकेच नाही तर अंबानीच्या कार्यक्रमामध्ये ऋतिक रोशन हा चक्क हातामध्ये सबा आझाद हिची चप्पल घेऊन फिरताना दिसला होता. अनेकांना ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांची जोडी अजिबातच आवडत नाही. वडील आणि मुलीची जोडी म्हणून अनेकदा यांना ट्रोल केले जाते.
सध्या सोशल मीडियावर ऋतिक रोशन याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे ऋतिक रोशन चर्चेत आहे. ऋतिक रोशन याचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त करत ऋतिक रोशन याला खडेबोल सुनावण्यास सुरूवात केलीये. हा व्हिडीओ मुंबईमधील आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक चाहता (डिलीवरी बाॅय) ऋतिक रोशन याला पाहून त्याच्या जवळ सेल्फी काढण्यासाठी येतो आणि विशेष म्हणजे ऋतिक रोशन देखील त्याला पोझ देतो. त्याचवेळी ऋतिक रोशन याचा बॉडीगार्ड येतो आणि त्या मुलाला धक्का देतो. हे सर्व ऋतिक रोशन पाहतो. मात्र, यावर तो आपल्या बॉडीगार्डला काहीच म्हणत नाही.
बॉडीगार्ड हा ऋतिक रोशन याच्या समोर त्या चाहत्याला धक्का देतो, तरीही ऋतिक रोशन काहीच म्हणत नसल्याने सर्वांना मोठा धक्का बसला. आता लोक ऋतिक रोशन याला जोरदार ट्रोल करत आहेत. एकाने लिहिले की, चाहत्यांमुळेच हे आहेत हे बाॅलिवूडचे कलाकार विसरले आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी हे असे का वागत नाहीत? दुसऱ्याने लिहिले की, या बाॅलिवूडच्या कलाकारांना चाहत्यांबद्दल प्रेम नाहीये. काहीतरी शिका साऊथच्या कलाकारांकडून