मुंबई : फराह खान हिने काही दिवसांपूर्वी बिग बाॅस 16 च्या स्पर्धेकांसाठी खास पार्टीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या पार्टीतील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या पार्टीमध्ये सर्वजण धमाल करताना दिसले. बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) मध्ये फॅमिली विकमध्ये फराह खान (Farah Khan) ही बिग बाॅस 16 च्या घरात गेली होती. यावेळी शिव ठाकरे याच्या गळ्याला पडत फराह खान म्हणाली होती की, मी इथे एक भाऊ सोडून गेले आणि मला आता तीन भाऊ मिळाले आहेत. यानंतर तिने सर्वांसाठी खास पार्टीचे आयोजन (Organizing a party) देखील केले.
सलमान खान याच्यानंतर फराह हिने पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीमध्ये बाॅलिवूडमधील काही कलाकार देखील पोहचले होते. नुकताच सोशल मीडियावर फराह खान हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये फराह खान ही भडकताना दिसत आहे. 14 तारखेला मुकेश छाबडाच्या आईचे निधन झाले. मुकेश छाबडाला भेटण्यासाठी फराह खान पोहचली. मात्र, पापाराझी यांना पाहून हे काय…म्हणताना फराह खान दिसली.
पापाराझी यांना नेहमीच फराह खान ही पोझ देताना दिसते. मात्र, मुकेश छाबडा याला भेटण्यासाठी जात असताना पापाराझी दिसल्याने फराह खान नाराज झाली. इतकेच नाहीतर पापाराझी यांना पाहून फराह खान तिथून निघून गेली. एक मिनिट देखील फराह खान तिथे थांबली नाही. यावेळी फराह खान ही मास्क लावताना देखील दिसली.
आता सोशल मीडियावर फराह खान हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. मात्र, या व्हिडीओनंतर अनेकांनी फराह खान हिला ट्रोल केले आहे. अनेकांनी फराह खान ही नाईट ड्रेसवर घराबाहेर पडल्याचे म्हटले. एकाने कमेंट करत या व्हिडीओवर म्हटले की, काय मॅडम नाईट ड्रेस बदलण्यासाठीही वेळ मिळाला नाही.
मुकेश छाबडाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या आईचे निधन झाल्याचे सांगितले. अत्यंत भावूक पोस्ट मुकेश छाबडाने शेअर केली. फक्त फराह खान हिच नाही तर बाॅलिवूडमधील अनेक स्टार हे मुकेश छाबडाला भेटण्यासाठी घरी पोहचले होते. दीपिका पादुकोण, आयुष्मान खुराना, भूषण कुमार, नूपुर सेनन, नुसरत भरुचा, हंसल मेहता हे मुकेश छाबडाला भेटण्यासाठी पोहचले.