Farhad Samji | फरहाद सामजीने सुनावले खडेबोल, ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर, ‘हेरा फेरी 3’चा वाद टोकाला?

| Updated on: Apr 15, 2023 | 3:09 PM

बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या हेरा फेरी 3 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये अक्षय कुमार हा म्हणाला की, मला चित्रपटाची स्टोरी अजिबात आवडली नसल्याने मी चित्रपट करण्यास नकार दिला, यानंतर सर्वांना धक्का बसला.

Farhad Samji | फरहाद सामजीने सुनावले खडेबोल, ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर, हेरा फेरी 3चा वाद टोकाला?
Follow us on

मुंबई : हेरा फेरी 3 (Hera Pheri 3) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने या चित्रपटाला करण्यास नकार दिला. यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. एक चर्चा सुरू होती की, अक्षय कुमार याने या चित्रपटाला मागितलेली फिस निर्मात्यांनी देण्यास नकार दिल्यानेच त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला. यानंतर अनेकांनी अक्षय कुमार (Akshay Kumar) याला खडेबोल सुनावण्यासही सुरूवात केली. मात्र, काही दिवसांनीच एका मुलाखतीमध्ये अक्षय कुमार हा म्हणाला की, मला चित्रपटाची स्टोरी अजिबात आवडली नसल्याने मी चित्रपट (Movie) करण्यास नकार दिला.

अक्षय कुमार याने जाहिरपणे आपल्याला चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली नसल्याचे म्हटल्याने निर्माते त्याच्यावर नाराज झाले. अक्षय कुमार याने चित्रपटाला नकार दिल्याने कार्तिक आर्यन याचे नाव बरेच दिवस चर्चेत होते. इतकेच नाही तर चक्क यावेळी चित्रपट निर्माते हे अक्षय कुमार याच्यासह कार्तिक आर्यन याच्याही संपर्कात होते. हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमार दिसणार नसल्याचे कळताच चाहते नाराज झाले.

शेवटी सर्वांना मोठा धक्का देत अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 या चित्रपटाला होकार दिला. फरहाद सामजी हे हेरा फेरी 3 चित्रपटाचे डायरेक्टर असल्याचे कळताच चाहत्यांनी आपला मोर्चा हा फरहाद सामजीकडे वळवला. सोशल मीडियावर सतत फरहाद सामजीला ट्रोल केले जात होते. हेरा फेरी 3 चित्रपट फ्लाॅप होईल, जर फरहाद सामजीने चित्रपट दिग्दर्शित केला तर असे अनेकांचे म्हणणे होते.

सोशल मीडियावर सतत हेरा फेरी 3 चित्रपटातून फरहाद सामजीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात यावा अशी मागणी जोरदार केली जात आहे. यावर चित्रपटाशी संबंधित कोणीही काहीही भाष्य केले नाही. आता यावर स्वत: फरहाद सामजीने मोठे भाष्य केले आहे. फरहाद सामजी सध्या सलमान खान याच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे.

एका मुलाखतीमध्ये बोलताना फरहाद सामजी म्हणाले, चित्रपटाची अजून ऑफिशियल घोषणा करण्यात आली नाहीये. यामुळे सोशल मीडियावर नकारात्मक बोलणारे लोक नेमके कोण आहेत, याबद्दल मला काही माहिती नाहीये. मला असे वाटते की, प्रत्येक व्यक्ती हा खूप जास्त मेहनत करतो. कोणाला काही अडचण असेल तर आम्ही चांगले चित्रपट बनवून आणि चांगले पंच लिहून ते दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

पुढे फरहाद सामजी म्हणाले, प्रत्येक वर्गातील प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवण्याचा माझा प्रयत्न आहे. मला असा चित्रपट बनवायचा आहे, ज्यामध्ये रोमांस, मसाला, अॅक्शन, कॉमेडी यांचे कॉम्बिनेशन असावे. भूल भुलैया 2, हाउसफुल 4 हे चित्रपट देखील फरहाद सामजीने केले आहेत. काही दिवसांपूर्वीच हेरा फेरी 3 चित्रपटाचा प्रोमो शूट करण्यात आला आहे.