मुंबई : आज (19 नोव्हेंबर) पंतप्रधानांनी तिन्ही कृषी कायदे (Farm Law) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी तिन्ही विधेयके मागे घेण्याचे जाहीर केले आहे. संसद या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या अधिवेशनादरम्यान घटनात्मकदृष्ट्या रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल. आज या निर्णयानंतर सर्वच स्तरातून लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. चित्रपट जगतातील अनेक सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले आहे. मात्र, कंगना रनौत (Kangana Ranaut) या निर्णयावर नाराज असल्याचे दिसत आहे.
कृषीविषयक तीनही कायदे मागे घेतल्यावर नाराजी व्यक्त करत कंगनाने लिहिले की, ‘दुःखद, लज्जास्पद आणि पूर्णपणे चुकीचे… संसदेत बसलेल्या सरकारऐवजी रस्त्यावर बसलेले लोक कायदे बनवू लागले, तर तेही जिहादी आहे. हा देश आहे… ज्यांना हे हवे आहे त्या सर्वांचे अभिनंदन.’
कंगनाने आनंद रंगनाथन यांचे ट्विट तिच्या स्टोरीवर शेअर केले आहे. ज्यामध्ये ते सध्याच्या सरकारच्या या निर्णयाला भ्याडपणा म्हणत आहेत. आनंदने लिहिले आहे की, सरकारचे हे भ्याड कृत्य आहे. हा देशाच्या प्रगतीचा आणि विकासाचा पराभव आहे. विरोधकांप्रमाणे नरेंद्र मोदी देशाला अनेक दशके मागे घेऊन जात आहेत. भारत हरला आहे. अराजकाचा विजय झाला आहे. वाईट दिवस येत आहेत.
यापूर्वी कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ कंगनाने शेतकर्यांना दहशतवादीही म्हटले होते. तिने लिहिलं होतं की, ‘पंतप्रधान, झोपलेल्याला उठवता येईल, गैरसमज असलेल्याला समजावता येईल, पण जो झोपला आहे, मुर्खासारखं वागतोय त्याला तुमच्या स्पष्टीकरणात काय फरक पडणार आहे? हे तेच दहशतवादी आहेत, CAA ने एकाही व्यक्तीचे नागरिकत्व गमावले नाही, परंतु त्यांनी रक्ताचे पाट वाहिले आहेत.’
मात्र, या विधानानंतर कंगनावर बरीच टीका झाली. कंगनाच्या या ट्विटनंतर #Arrest_Castiest_Kangna असे वेगवेगळे हॅशटॅग ट्रेंड करू लागले आणि कंगना रनौतला अटक करण्याची मागणी होऊ लागली. आयपीसीच्या कलम 44, 108, 153, 153 ए आणि 504 अंतर्गत अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल देखील करण्यात आला आहे.
Hina Khan | हिना खानने बाथटबमध्ये केलं फोटोशूट, बोल्ड फोटोंनी घातलाय सोशल मीडियावर धुमाकूळ!