बॉलिवूडला लागली तरी कोणाची नजर, जान्हवी कपूर आणि सोनाक्षीच्या चित्रपटांचे ‘ओपनिंग डे’चे कलेक्शन काही लाखात

| Updated on: Nov 05, 2022 | 2:36 PM

हे तिन्ही नाव बाॅलिवूडमधील मोठी नावे आहेत. मात्र, या तिघींच्या चित्रपटाला ओपनिंग डेला धमाका करण्यात यश मिळाले नाहीये.

बॉलिवूडला लागली तरी कोणाची नजर, जान्हवी कपूर आणि सोनाक्षीच्या चित्रपटांचे ओपनिंग डेचे कलेक्शन काही लाखात
Follow us on

मुंबई : बॉलिवूड चित्रपटांचे अच्छे दिन कब आयेंगे हा प्रश्न आता विचारला जातोय. कारण शुक्रवारी बाॅलिवूडचे तीन चित्रपट रिलीज झाले आहेत. त्यामध्ये एक कतरिना कैफचा दुसरा सोनाक्षी सिन्हाचा आणि तिसरा जान्हवी कपूरचा. हे तिन्ही नाव बाॅलिवूडमधील मोठी नावे आहेत. मात्र, या तिघींच्या चित्रपटाला ओपनिंग डेला धमाका करण्यात यश मिळाले नाहीये. इतकेच नाही तर फक्त कतरिनाचा चित्रपट सोडला तर इतर दोन चित्रपटांना तर कोटीचा आकडा पण पार करण्यात यश मिळाले नाही.

बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फेल जात असतानाच दुसरीकडे साऊथचे हिंदी डब केलेले चित्रपट बाॅक्स आॅफिसवर रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी करत आहेत. साऊथच्या चित्रपटामध्ये असे नेमके काय आहे, जे आपल्या चित्रपटात नाही, याचा विचार बाॅलिवूड चित्रपट निर्मात्यांना करण्याची वेळ आलीये.

कतरिना कैफच्या फोन भूत चित्रपटाची जोरदार चर्चा होती. मात्र, ओपनिंग डेला चित्रपटाला खास कमाल करण्यात यश मिळाले नाहीये. ओपनिंग डेला चित्रपटाने फक्त 2.05 कोटींचे कलेक्शन केले आहे. कतरिनासोबत या चित्रपटात इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला अपेक्षित ओपनिंग मिळाले नाहीये.

जान्हवी कपूरच्या मिली चित्रपटाची सुरूवात अत्यंत खराब झालीये. मिली चित्रपटाची ओपनिंग डेची कमाई 45 ते 65 लाखांची आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वत: जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर यांनी केलीये. सोनाक्षी सिन्हाचा बहुचर्चित चित्रपट डबल XL या चित्रपटाचे हाल तर सर्वांत वाईट आहेत. डबल XL ची पहिल्या दिवसाची कमाई फक्त 25 लाख आहे.