गणपती बाप्पाच्या आगमनासाठी बॉलिवूडमधील ही खास 8 गाणी लावा आणि वातावरण सर्वत्र प्रसन्न करा…

| Updated on: Aug 31, 2022 | 10:45 AM

गणेशाच्या स्वागताच्या तयारीत सर्वजण व्यस्त आहेत. त्याचबरोबर आजपासून बाप्पाची पूजा केली जाणार आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) गणपती पूजेचा महिमा प्रत्येक गल्ली, कानाकोपऱ्यात पाहायला मिळतोयं.

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी बॉलिवूडमधील ही खास 8 गाणी लावा आणि वातावरण सर्वत्र प्रसन्न करा...
Follow us on

मुंबई : आज संपूर्ण देशात गणपती बाप्पाचे (Ganapati Bappa) आगमन होत आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसत असून बाजार पेठांमध्ये मोठी गर्दी बघायला मिळतंय. गणेशाच्या स्वागताच्या तयारीत सर्वजण व्यस्त आहेत. त्याचबरोबर आजपासून बाप्पाची पूजा केली जाणार आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) गणपती पूजेचा महिमा प्रत्येक गल्ली, कानाकोपऱ्यात पाहायला मिळतोयं. यादरम्यान गपणपती बाप्पाचे अनेक गाणे लावले जातात. चला तर मग जाणून घेऊयात खास गणपती बाप्पांचे बॉलिवूडमधील (Bollywood) स्पेशल गाणी…
हृतिकच्या अग्निपथ चित्रपटातील ‘देवा श्री गणेशा’ हे गाणे तुम्हाला गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी एक वेगळेच चैतन्य देईल.

अमिताभ बच्चन यांच्या अग्निपथ चित्रपटातील खास गाणे तुम्ही बाप्पाच्या आगमना वेळी नक्कीच लावू शकता.

अमिताभ बच्चन आणि शर्मिला टागोर यांच्या विरुद्ध चित्रपटातील गणपतीचे गाणे ‘श्री गणेशाय धीमही’ हे गाणे तुम्ही आज खास प्रसंगी लावू शकता.

श्रद्धा कपूर आणि वरुण धवनच्या ‘ABCD’ चित्रपटातील ‘गणपती बाप्पा मोरया’ हे गाणेही या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

शाहरुख खानच्या डॉन चित्रपटातील ‘मोरया रे बाप्पा’ हे गाणे गणेश चतुर्थीच्या गाण्यांमध्ये सुपरहिट मानले जाते.

डॅडी चित्रपटातील ‘बाप्पा’ हे गाणेही या उत्सवासाठी खूप प्रसिद्ध आहे. या चित्रपटात रितेश देशमुखची महत्वाची भूमिका बघायला मिळते.

वरुण धवनच्या जुडवा 2 चित्रपटातील ‘गणपती बाप्पा मोरया’ हे गाणे देखील आजसाठी अत्यंत खास आहे.

सलमान खान आणि वरुणच्या ‘अंतिम’ चित्रपटातील ‘विघ्नहर्ता’ हे गाणे गणेशपूजेसाठी स्पेशल आहे.