मुंबई : गायक राहुल वैद्य हेडलाईन्समध्ये आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या गरबा साँगच्या वादामुळे गायकाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. ‘गरबे की रात’ या गाण्यात गुजरातमध्ये पूजल्या जाणाऱ्या श्री मोगल मांचा उल्लेख केल्यामुळे लोक संतापले आहेत. वाढता वाद पाहून राहुल यांनी लोकांची माफी मागितली आणि आणि गाण्यात सुधारणा करू असे सांगितले आहे.
बरं, एखाद्या सेलिब्रिटीला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याची ही पहिली वेळ नाही. बॉलिवूड कलाकारांना त्यांच्या चित्रपटातील भूमिकेबाबत किंवा कधीकधी इतर सामग्री किंवा विधानांसाठी आक्रमकतेला सामोरे जावे लागते. या यादीत सलमान खानपासून आमिर खानपर्यंतच्या नावांचा समावेश आहे. चला तर, जाणून घेऊया अशा सेलेब्सबद्दल…
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला रवी पुजाराकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हॅपी न्यू इयरच्या शूटिंग दरम्यान सेटवर एक चिठ्ठी सापडली सापडली. ज्यात असे लिहिले होते की, शाहरुख खान त्याचे पुढील लक्ष्य असेल. ही नोट कुख्यात गुंड छोटा राजनने पाठवली होती, असे म्हटले होते.
2010 मध्ये अमिताभ बच्चन यांनी एका ब्लॉगरविरोधात पोलीस तक्रार दाखल केली. ब्लॉगरने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होता. बऱ्याच काळापासून ब्लॉगरच्या धमक्या येत होत्या. बिग बींनी प्रथम याकडे दुर्लक्ष केले आणि नंतर ते बंद न झाल्यामुळे पोलिसांकडे तक्रार केली.
खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारला गुंड रवी पुजारा याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. एका व्यक्तीने अक्षयला फोन केला आणि स्वतःला रवी पुजारा म्हटले होते. त्या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारला नोकरीवरून काढलेल्या नोकराबद्दल विचारले.
सलमान खानला फेसबुकवर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. हे फेसबुक पेज पंजाब विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या नावाने होते. जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पोस्टमध्ये सलमान खानच्या फोटोवर लाल क्रॉसचे चिन्ह होते. मेसेजमध्ये लिहिले होते, ‘तुम्हाला वाटते की तुम्ही कायद्याच्या वर आहात. पण बिष्णोई समाज आणि सोपू पक्षाने तुम्हाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तुम्ही सोपू कोर्टात दोषी आहात. हे प्रकरण 1998च्या काळवीट शिकार प्रकरणात सलमानची निर्दोष मुक्तता झाल्यापासून आहे.’
आमिर खानला त्याच्या ‘सत्यमेव जयते’ या शोच्या पहिल्या सीझनमध्ये जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्याच्या सुरक्षेसाठी आमिरने एक बॉम्ब / बुलेटप्रूफ कार खरेदी केली होती. ज्याची किंमत 10 कोटी असल्याचे सांगितले जात होते.
2007 मध्ये एका स्टॉकरने कंगना राणौतची बहीण रंगोलीवर अॅसिड फेकले होते. कंगनाला त्याच व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर कंगनाने पोलिसांकडे तक्रार केली होती.
स्वरा भास्करला तिच्या ‘अनारकली ऑफ आराह’ चित्रपटाच्या रिलीज दरम्यान धमक्या आल्या होत्या. स्वराला सोशल मीडियावर दोन ते तीन धमक्या आल्या होत्या. त्यानंतर स्वराने ट्विटर सोडल्याचे सांगितले होते.
मल्लिका शेरावतलाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. मल्लिकाने भंवरी देवीच्या जीवनावर आधारित चित्रपट करण्याचा खुलासा केला तेव्हा हे घडले होते.
प्रेक्षकांना आवडलाय विकी कौशलचा ‘सरदार उधम’, सोशल मीडियावर चाहते करतायत कौतुकाचा वर्षाव!
‘सूर्यवंशी’च्या प्रमोशनसाठी कतरिना कैफ पोहोचली ‘झी मराठी’च्या अवॉर्ड फंक्शनमध्ये, पाहा खास फोटो