काय सांगता राव, मन्नत बंगल्याबाहेरील नेमप्लेट हिऱ्यांची? गाैरी खान हिने फोटो शेअर करत सांगितले सत्य

| Updated on: Nov 22, 2022 | 4:14 PM

शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याबाहेर त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची कायमच गर्दी असते.

काय सांगता राव, मन्नत बंगल्याबाहेरील नेमप्लेट हिऱ्यांची? गाैरी खान हिने फोटो शेअर करत सांगितले सत्य
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि त्याचा बंगला मन्नत कायमच चर्चेत असतात. शाहरुख खान केवळ मोठ्या पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही एखाद्या राजासारखे आयुष्य जगतो. शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याबाहेर त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची कायमच गर्दी असते. मुंबई फिरण्यासाठी आलेले लोक मन्नत बंगला बघण्यासाठी येतात. शाहरुखचा मन्नत बंगला अत्यंत खास आहे. हा फक्त बंगला नसून आतमध्ये एखाद्या राज महालसारखा आहे.

शाहरुख खान मुंबईत त्याच्या मन्नत या बंगल्यात संपूर्ण कुटुंबासह राहतो. 2001 मध्ये बाई खोरशेद भानू संजना ट्रस्टकडून शाहरुख खान याने हा बंगला घेतला आणि त्यानंतर याचे नाव मन्नत असे ठेवले. या मन्नत बंगल्याची झलक पाहण्याची सर्वांची इच्छा असते. शाहरुख खानचा हा बंगला तब्बल 6000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे.

शाहरुख खानचा मन्नत बंगला बघण्यासाठी आलेला प्रत्येक व्यक्ती बंगल्याच्या पुढे लावण्यात आलेल्या नेमप्लेटजवळ उभे राहून फोटो काढतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मन्नत बंगल्या पुढे लावण्यात आलेली मन्नत नेमप्लेट गायब होती. यामुळे चाहत्यांच्या पदरी निराशा पडत होती आणि फोटो घेतल्याशिवाय चाहत्यांना जावे लागत होते.

मन्नत बंगल्याची नेमप्लेट दुरूस्तीसाठी पाठवण्यात आल्याचे सांगितले जात होते. आता नेमप्लेट तर परत आलीये. परंतू जरा वेगळ्याच चर्चांना प्रचंड उधाण आले. मन्नत बंगल्याबाहेर लावण्यात आलेली नेमप्लेट अतिशय सुंदर असून अप्रतिम काम हे नेम प्लेटवर करण्यात आले आहे.

चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर एक चर्चा होती की, मन्नतच्या बाहेर लावण्यात आलेल्या नेमप्लेटसाठी हिऱ्यांचा वापर करण्यात आलाय. खरोखरच हिरे नेमप्लेटसाठी वापरण्यात आले आहेत का? हा प्रश्न चाहते सतत सोशल मीडियावर शाहरुख खान आणि गाैरी खान यांना विचारत होते.

शेवटी या नेम प्लेटसंदर्भात स्पष्टीकरण देत गाैरी खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. यामध्ये गाैरीने या नेम प्लेटसाठी कोणते मटेरिअल वापरले आहे हे चाहत्यांना सांगितले आहे. विशेष म्हणजे ही नेम प्लेट गाैरी खान हिने डिजाईन केलीये.