मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान हा चाहत्यांकडे दुर्लक्ष करत जाताना दिसला. शाहरुख खान याचा हा व्हिडीओ (Video) पाहून अनेकांनी संताप व्यक्त करत शाहरुख खान याला खडेबोल सुनावले होते. शाहरुख खान हा त्याच्या आगामी डंकी चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच कश्मीर येथे पोहचला होता. विशेष म्हणजे चित्रपटाच्या सेटवरील अनेक व्हिडीओ आणि फोटो (Photo) हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसला. या चित्रपटाला प्रेक्षकांचे उदंड असे प्रेम मिळाले आणि शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हाच चित्रपट ठरला. शाहरुख खान याने पठाण चित्रपटानंतर लगेचच जवान आणि डंकी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली.
शाहरुख खान हाच नाही तर शाहरुख खान याची पत्नी गाैरी ही देखील कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे गाैरी खान ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. गाैरी खान कायमच सोशल मीडियावर फॅमिली फोटो शेअर करताना दिसते. गाैरी खान हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे ती चर्चेत आलीये. विशेष म्हणजे गाैरी खान हिची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
गाैरी खान हिने तिच्या आॅफिस बाहेरील व्हिडीओ शेअर केला आहे. गाैरी खान हिच्या आॅफिसमधून लेकीचा जाहिरातीमध्ये फोटो पाहून गाैरी खान अत्यंत आनंदी झालीये. एका जाहिरातीचे होर्डिंग गाैरी खान हिच्या आॅफिस बाहेर लागले असून या जाहिरातीमध्ये सुहाना खान ही दिसत आहे. याचाच व्हिडीओ गाैरी खान हिने शेअर केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत गाैरी खान हिने लिहिले की, आज मी माझ्या आॅफिसमध्ये कोणाला पाहिले. आता गाैरी खान हिने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. आई गाैरी खान हिच्या पोस्टवर कमेंट करत सुहाना खान हिने किसचे इमोजी शेअर केले आहे. गाैरी खान हिच्या या पोस्टवर मलायका अरोरा हिने देखील कमेंट केलीये.