Govinda: “यशस्वी झाल्यावर अनेकजण पाय खेचण्याचा प्रयत्न करतात”; गोविंदाने फिल्म इंडस्ट्रीबद्दल व्यक्त केली नाराजी

| Updated on: Jun 10, 2022 | 2:51 PM

2017 मध्ये अनुराग बासूच्या 'जग्गा जासूस' या चित्रपटासाठी गोविंदाला पाहुण्या कलाकाराची भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र त्याच्या अनप्रोफेशनल वागणुकीमुळे त्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याची चर्चा सुरू झाली.

Govinda: यशस्वी झाल्यावर अनेकजण पाय खेचण्याचा प्रयत्न करतात; गोविंदाने फिल्म इंडस्ट्रीबद्दल व्यक्त केली नाराजी
Govinda
Image Credit source: Facebook
Follow us on

अभिनेता गोविंदाने (Govinda) ऐशी-नव्वदीच्या काळात एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. बॉलिवूडमधील या यशस्वी करिअरनंतर त्याने 2000 च्या सुरुवातीला अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला आणि राजकारणात प्रवेश केला. गोविंदाने त्याच्या ‘अनप्रोफेशनल’ (unprofessionalism) वागणुकीमुळे बरेच प्रोजेक्ट्स गमावल्याची इंडस्ट्रीत (film industry) चर्चा होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने या चर्चांवर मौन सोडलं आहे. या मुलाखतीत गोविंदाने त्याची बाजू सविस्तरपणे मांडली. 2017 मध्ये अनुराग बासूच्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटासाठी गोविंदाला पाहुण्या कलाकाराची भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र त्याच्या अनप्रोफेशनल वागणुकीमुळे त्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. यावर जुलै 2017 मध्ये त्याने काही ट्विट्स करत संताप व्यक्त केला होता. गोविंदासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम करणारे निर्माते-दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनीसुद्धा नंतर गोविंदासोबत काम करण्यात नकार दिला होता.

मनिष पॉलला दिलेल्या मुलाखतीत गोविंदा म्हणाला, “मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश नाही केला. तर इंडस्ट्री माझ्याकडे आली. मी फक्त 21 वर्षांचा होतो आणि त्यावेळी मी 75 चित्रपट साईन केले होते. मला आठवतंय की दिलीप साहब माझ्याजवळ येऊन म्हणाले होते, ‘गोविंदा, त्यापैकी 25 चित्रपटाला नकार दे’. साईन करताना मिळालेली रक्कम मी खर्च केल्याचं त्यांना सांगितलं. ते पैसे तुला परत कसे मिळतील याची चिंता तू देवावर सोड पण ते मी परत केले पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं. ते जे बोलले ते अगदी खरं होतं. मी आजारी पडत होतो. दिवसातून चार ते पाच शिफ्ट्समध्ये काम करून मी हॉस्पीटलला जात होतो. एकेकाळी मी सलग 16 दिवसांसाठी झोपलोसुद्धा नव्हतो.”

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

मुलाखतीत मनिषने गोविंदाला सांगितलं की, त्याच्या स्टारडममुळे अनेक दिग्दर्शक आणि निर्मातेही स्टार झाले. मग जेव्हा त्यांनी त्याच्यावर अनप्रोफेशनल आणि सेटवर उशीर झाल्याचा आरोप केला तेव्हा वाईट वाटतं का, असं त्याने विचारलं. यावर गोविंदाने सांगितलं की ज्यांनी त्याच्यासोबत अनेक प्रोजेक्ट्सवर काम केलं, त्या निर्मात्यांनी या अफवा पसरवल्या नाहीत. “जेव्हा तुम्ही यशस्वी होता, तेव्हा असे बरेच लोक असतात जे तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील. जेव्हा मी 14-15 वर्षांसाठी यशाच्या शिखरावर होतो, जेव्हा सर्व काही माझ्या बाजूने चाललं होतं, तेव्हा कोणीही हे मुद्दे उपस्थित केले नाहीत. ही फिल्म इंडस्ट्री आहे, काळाबरोबर इथे लोक बदलतात आणि समीकरणंदेखील बदलतात”, असं तो म्हणाला.