मुंबई : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेने (Chunky Pandey) अनेक चित्रपटांमध्ये काम केले, परंतु मुख्य नायक म्हणून तुम्हाला त्याचा कोणताही ब्लॉकबस्टर चित्रपट क्वचितच आठवत असेल. चंकी हा बॉलिवूडचा असा एक स्टार आहे, ज्याने खूप काम केले पण त्याला त्याला ते यश मिळाले नाही ज्यासाठी तो कदाचित पात्र होता. चंकी पांडेचे नाणे हिंदी चित्रपटात चालले नसेल, पण आजही तो बांगलादेशचा सुपरस्टार आहे. होय, बांगलादेश चित्रपट उद्योगात चंकीला ‘सुपरहिरो’ची पदवी देण्यात आली आहे.
चंकीचा जन्म 26 सप्टेंबर 1962 रोजी मुंबईत झाला. ‘आग ही आग’ द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या चंकीचे खरे नाव सुयेश पांडे आहे. त्याला घरात प्रेमाने चंकी म्हटले जायचे. त्याने चित्रपटांमध्येही तेच नाव रुजू केले. असे म्हटले जाते की, गोविंदामुळे चंकीला त्याच्या पहिल्या चित्रपटाची ऑफर आली आणि गोविंदाच्या स्टारडमच्या आधीच त्याची कारकीर्द संपली.
‘पाप की दुनिया’, ‘खतरों के खिलाडी’, ‘जहरीले’ आणि ‘आँखें’ सारख्या हिट चित्रपटांसह बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवलेल्या चंकीने 1988 साली ‘तेजाब’ मध्ये अनिल कपूरच्या मित्राची भूमिका साकारली होती. त्यासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. ते 90चे दशक होते, ज्या काळात चंकीला बहुतेक सहाय्यक पात्रे मिळू लागली.
‘तेजाब’मध्ये दिसल्यानंतर चंकी पांडेने अंदाजे 20 चित्रपट साईन केले. चंकीने पैसे कमवण्यासाठी हे चित्रपट साईन केले होते, पण यातील काही चित्रपटांनी जादू दाखवली आणि बहुतेक चित्रपट फ्लॉप झाले. करिअरच्या दृष्टीने चंकीचा हा निर्णय अत्यंत चुकीचा ठरला. हळूहळू त्याला काम मिळणे बंद झाले. प्रसंगाची निकड पाहून चंकी पांडे बांगलादेशी सिनेमाकडे वळला.
चंकीचा हा निर्णय त्याच्या कारकिर्दीच्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरला. 1995 मध्ये चंकी पांडेने पहिल्यांदा बांगलादेशी चित्रपटात काम केले. स्थानिक भाषा माहित नसतानाही, चंकीने बांगलादेशमध्ये स्टारडम चाखले. चंकीने ‘स्वामी केनो असमी’, ‘बेश कोरेची प्रेम कोरेची’ यासह अनेक हिट चित्रपट दिले. अनेक चित्रपट बॅक टू बॅक केल्यानंतर, चंकीला बांगलादेशी सिनेमामध्ये हिंदी चित्रपटात शाहरुख खानसारखी ओळख आणि अमिताभ बच्चनसारखी प्रसिद्धी मिळाली.
बांगलादेशमध्ये आपला जम बसवल्यानंतर चंकीने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. 2003च्या मल्टीस्टारर चित्रपट ‘कयामत’मध्ये चंकी एका शास्त्रज्ञाची नकारात्मक भूमिका साकारताना दिसला होता. यानंतर त्याने ‘पेइंग गेस्ट’, ‘हाऊस फुल’, ‘हाऊसफुल 2’, ‘बुलेट राजा’ यासारख्या चित्रपटांमध्येही काम केले. ‘पास्ता’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंकी पांडेने आपल्या कारकिर्दीत विनोदी तसेच नकारात्मक पात्र देखील साकारली.
Bigg Boss Marathi 3 | ‘महिला, महिला आणि भांडायला पहिला…’, सोनालीची तृप्ती देसाईंसोबत तूतू-मैमै!
Drugs Case | मुंबई आणि गोवा एनसीबीची संयुक्त कारवाई, अर्जुन रामपालचा मेहुणा अॅगिसिलोसला पुन्हा अटक!