मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे खूप प्रतिभावान आहेत, पण तरीही ते नेहमीच सहकलाकारांच्या भूमिकेत दिसतात. ते फक्त सहकलाकार म्हणून प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण करतात. राजपाल यादव, विजय राज असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांनी सह कलाकार म्हणून खूप नाव कमावले आहे. पण जेव्हा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी सहकलाकारांचा प्रश्न येतो तेव्हा दिव्या दत्ताचे (Divya Dutta ) नाव सगळ्यात आधी येते. दिव्या दत्ता 25 सप्टेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करते.
दिव्याचे अभिनय क्षेत्रात येणे हा एक योगायोग होता. तिला चित्रपट जगताच्या बातम्या वाचण्याची आवड होती. अशा परिस्थितीत तिने एका चित्रपटाशी संबंधित मासिक वाचताना एका स्पर्धेचा फॉर्म भरला, ज्यात तिची निवड देखील झाली आणि तिचा अभिनयाचा प्रवास इथूनच सुरू झाला.
दिव्या दत्ताने 1994 मध्ये मनोरंजन विश्वात पदार्पण केले. ती ‘इश्क में जीना इश्क में मरना’ या चित्रपटात दिसली होती. दिव्यामध्ये खूप प्रतिभा होती, एवढेच नाही तर तिच्या भाषांवरही तिची अद्भुत पकड होती. हिंदी व्यतिरिक्त, अभिनेत्रीने पंजाबी, इंग्रजी, तेलगू, तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये आपली अभिनय क्षमता सिद्ध केली आहे.
दिव्याने चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका कमी साकारल्या. परंतु, सह-कलाकार म्हणून तिने अशी छाप सोडली की, प्रत्येकजण फक्त तिच्याकडेच पाहत राहिला. आपल्या पदार्पणाच्या 14 वर्षानंतर, दिव्याने ते स्थान मिळवले ज्याचे प्रत्येक कलाकार स्वप्न पाहतो. ‘इरादा’ चित्रपटासाठी अभिनेत्रीला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता जरी सेलेब्सना अनेक पुरस्कार मिळत असले, तरी पण राष्ट्रीय पुरस्काराचे महत्त्व वेगळे आहे.
तसे, अभिनयासाठी पसंत केल्या गेलेल्या दिव्या दत्ताने एकेकाळी मॉडेलिंगही केले आहे. होय, ती टीव्ही जाहिरातींसाठी मॉडेलिंगही करायची. या सर्वांव्यतिरिक्त, दिव्याने डबिंग क्षेत्रात देखील काम केले आहे. तिने अभिनेत्री लिसा रे हिच्यासाठी हिंदी डबिंग केले. लिसाचे हिंदी त्यावेळी फारसे चांगले नव्हते, त्यामुळे तिच्या चित्रपटासाठी दिव्याची मदत घेण्यात आली.
दिव्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिला अमिताभ बच्चन खूप आवडायचे. दिव्या त्यांच्या ‘खैके पान बनारसवाला’ या गाण्यावर खूप नाचत असे. तिने त्या गाण्यावर नृत्य करून अभिनय करायलाही शिकली. एका मुलाखतीत तिने सांगितले की, गाण्यादरम्यान ती ओठ लाल करण्यासाठी लिपस्टिक वापरत असे. आजमितीला दिव्याने अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ओटीटी जगातही आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. अभिनेत्री ‘स्पेशल कॉप्स’ आणि ‘होस्टेज 2’मध्ये दिसली आहे.
‘लगान’मधील ‘केसरीया’ आर्थिक तंगीने बेजार, 11 वर्षांपासून बेरोजगार, औषध पाण्यासाठीही पैसे नाहीत!
Sardar Udham : अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने ‘सरदार उधम’च्या वर्ल्ड वाइड प्रीमियरची केली घोषणा!