मुंबई : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) पत्नी गौरी खानचा (Gauri Khan) वाढदिवस 8 ऑक्टोबर रोजी आहे. गौरीचा जन्म 8 ऑक्टोबर 1970 रोजी दिल्लीत झाला. गौरी खान एक चित्रपट निर्माती आणि डिझायनर आहे. तिने अनेक सेलिब्रिटींच्या घरापासून ऑफिसपर्यंतची रचना केली आहे. इंटिरिअर डिझायनर गौरी खानने तिच्या स्वतःच्या घरापासून ते शाहरुख खानच्या ऑफिसपर्यंत सर्वकाही डिझाईन केले आहे. तिच्या क्लायंट लिस्टमध्ये मुकेश अंबानीपासून सिद्धार्थ मल्होत्रापर्यंत अनेक सुप्रसिद्ध सेलिब्रिटींचा समावेश आहे. मुंबईत त्याचे आलिशान घर आहे. लॉकडाऊन दरम्यान, तिने रेड चिलीजच्या कार्यालयाची रचना केली, ज्याचे फोटो देखील शेअर केले गेले होते.
गौरीने आपले प्राथमिक शिक्षण दिल्लीतूनच पूर्ण केले आहे. तिने लेडी श्री राम कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून इतिहासात पदवी प्राप्त केली आहे. यानंतर गौरीने 25 ऑक्टोबर 1991 रोजी शाहरुख खानशी लग्न केले. त्यांना- आर्यन खान, अबराम खान आणि मुलगी सुहाना खान अशी तीन मुले आहेत.
आर्यन खान सध्या ड्रग्ज आणि रेव्ह पार्टी प्रकरणात आरोपी आहे आणि त्याच्याविरुद्ध तपास चालू आहे. गौरी आणि शाहरुख खानचे लव्ह मॅरेज होते. शाहरुख खानसोबत तिची पहिली भेट 1984 साली झाली. त्यावेळी शाहरुख खान इतका मोठा कलाकार नव्हता आणि त्याचा संघर्षा सुरु होता. शाहरुख आणि गौरी यांनी सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न केले.
गौरी आणि शाहरुखची प्रेमकहाणी इंडस्ट्रीमध्ये सर्वोत्तम उदाहरण आहे. पहिल्या भेटीत जेव्हा शाहरुखला गौरीशी बोलायचे होते, तेव्हा तिने आपला प्रियकर बाहेर वाट पाहत असल्याचे सांगून त्याला नकार दिला होता. खरतर, त्यावेळी गौरीचा भाऊ बाहेर वाट पाहत होता. शाहरुखला जेव्हा कळले की, गौरी त्याच्याशी खोटे बोलते, तेव्हा त्याने गौरीला आपली बहीण मानण्याचा विनोद केला होता.
हळूहळू दोघांचे अफेअर सुरु झाले. नंतर शाहरुखला न सांगता गौरी तिच्या मित्रांसोबत मुंबईला गेली होती. यानंतर शाहरुखही आईकडून हजार रुपये घेऊन गौरीच्या शोधात मुंबईला आला. 5 वर्षांहून अधिक काळ अफेअर चालल्यानंतर, दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि कुटुंबातील सदस्यांना सांगितले. पण, गौरीच्या कुटुंबीयांना हे नाते मान्य नव्हते, कारण गौरी हिंदू आणि शाहरुख मुस्लिम होते. शेवटी दोघांच्या प्रेमापुढे झुकावे लागले आणि दोघांनी लग्न केले.
वास्तविक, शाहरुख आणि गौरी पहिल्यांदा एका पार्टीमध्ये भेटले. जिथे गौरीला पाहिल्यानंतर शाहरुख तिच्या प्रेमात पडला. त्यावेळी शाहरुख खान 19 वर्षांचा होता आणि गौरी फक्त 14 वर्षांची होती. शाहरुखला पहिल्या नजरेत तिच्यावर प्रेम जडले. त्याला तिच्याशी बोलायचे होते, पण गौरीने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला.
शाहरुख आणि गौरी एकमेकांवर खूप प्रेम करतात. एक काळ होता जेव्हा शाहरुख खानला वाटत होते की, त्याची बायको हॉस्पिटलमध्ये मरणार आहे. खुद्द किंग खाननेच याचा खुलासा केला होता. शाहरुख खान त्याच्या एका मुलाखतीत म्हटले होते की, मी माझे आई-वडील हॉस्पिटलमध्ये गमावले म्हणूनच मला हॉस्पिटलमध्ये राहायला आवडत नाही आणि गौरी खूप नाजूक आहे. मी तिला आजारी पडताना कधीच पाहिले नाही. जेव्हा मी तिला हॉस्पिटलमध्ये पाहिले, तेव्हा ती बेशुद्ध पडली होती. आर्यनच्या जन्मावेळी गौरीची अवस्था बघून मी खूप घाबरलो होतो.
ह्रदयस्पर्शी! आर्यनला हवं तर विसरा, पण ह्रतिक रोशनची एक पोस्ट जी प्रत्येक तरुणानं वाचावी!
नागा चैतन्यशी घटस्फोटानंतर समंथाने सोशल मीडियावर शेअर केला पहिला फोटो, पाहा अभिनेत्रीचा अनोखा अंदाज…