मुंबई : गुरु रंधावा (Guru Randhawa) हा एक सुप्रसिद्ध भारतीय गायक, गीतकार आणि संगीतकार आहे. गुरू पहिला आपल्या गावी अर्थात गुरदासपूरमध्ये छोटेमोठे स्टेज शो करायचा आणि नंतर त्यांनी दिल्लीत छोट्या पार्ट्यांमध्ये परफॉर्म करायला सुरुवात केली. गुरूचे खरे नाव गुरशरणजोत रंधावा आहे.
बोहेमियाने गायकाला गुरू’ हे नाव दिले. गुरुने 2012 मध्ये ‘सेम गर्ल’ या गाण्याने आपला संगीत प्रवास सुरु केला. या गाण्यात अर्जुन त्याच्यासोबत होता, पण हे गाणे जास्त गाजू शकले नाही.
बोहेमिया गुरू रंधावाचे हितचिंतक आहेत आणि त्यांनीच टी-सीरिजला गुरुला लाँच करण्यास सांगितले. यानंतर दोघांनी मिळून ‘पटोला’ हे गाणे काढले, जे सुपरहिट ठरले. गुरूने आतापर्यंत ‘लाहोर’(Lahore), ‘पटोला’(Patola), ‘हाय रेटेड गब्रू’(High Rated Gabru), ‘सूट’(Suit), ‘बनजा मेरी रानी’(Ban Ja Meri Rani), ‘ईशारे तेरे’(Ishare Tere) आणि ‘फॅशन’ (Fashion) सारखी सुपरहिट गाणी केली आहेत.
चला तर, आज (30 ऑगस्ट) गुरूच्या वाढदिवशी, या हिट गायकाची हिट गाणी ऐकूया…
गुरू जितका प्रतिभावान गायक आहे, तितकाच तो स्टायलिश व्यक्ती देखील आहे. 2018 मध्ये, टाइम्सच्या ‘मोस्ट डिजायरेबल मॅन’च्या यादीत तो 23 व्या क्रमांकावर होता. 2019मध्ये तो चंदीगड ‘टाइम्स द मोस्ट डिजायरेबल मॅन’च्या यादीत चौथ्या क्रमांकावर होता आणि 2020मध्ये तो सहाव्या क्रमांकावर होता.
2018 मध्ये, गुरु सलमान खानच्या ‘दबंग रीलोडेड टूर’चा एक भाग होता. गुरु रंधावा यांनी गायक पिटबुल यांच्यासोबत गायलेले पहिले आंतरराष्ट्रीय गाणे नुकतेच रिलीज केले आहे. या गाण्याला यूट्यूबवर 24 तासांत 38 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. त्या वेळी हे गाणे 24 तासांमध्ये सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या गाण्यांपैकी एक होते.
श्रद्धा कपूर आणि रोहनच्या लग्नाच्या बातमीवर वडील शक्ती कपूर यांची प्रतिक्रिया
बॉक्स ऑफिसवर फिके पडले ‘चेहरे’ अमिताभ-इम्रानचीही जादू चालली नाही