मुंबई : हरविंदर सिंह संधू हे हार्डी संधूचे (Harrdy Sandhu) पूर्ण नाव आहे, ज्याने आपल्या गाण्यांनी सर्वांना नाचायला भाग पाडले. गायक असण्याव्यतिरिक्त हार्डी एक अभिनेता आणि माजी क्रिकेटपटू देखील आहे. हार्डीचे पहिले गाणे ‘टकीला शॉट’ (Tequila Shot) होते, मात्र त्याला 2013 मध्ये रिलीज झालेल्या ‘सोच’ (Soch) या गाण्याने ओळख मिळवून दिली आणि नंतर 2014मध्ये त्याचे ‘जोकर’ (Joker) नावाचे आणखी एक गाणे हिट झाले.
हार्डीने पुन्हा यारान दा केचप (Yaaran Da Ketchup) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 2016 मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या एअरलिफ्ट चित्रपटातही हार्डीचे सोच गाणे वापरले गेले. त्याच वेळी, त्याचे नाह हे गाणे आयुष्मान खुरानाच्या बाला चित्रपटात वापरले गेले. आज, हार्डीच्या वाढदिवशी, त्याची लोकप्रिय आणि हिट गाणी ऐका.
हार्डी हा पहिला पंजाबी गायक होता, ज्याचे गाणे ‘बॅकबोन’ने यूट्यूबवर 100 मिलिअन व्ह्यूज ओलांडले होते.
हार्डी पूर्वी क्रिकेट खेळायचा आणि उजव्या हाताचा फलंदाज होता. तो पंजाब रणजी संघाचाही एक भाग राहिला आहे. आता तो ‘83’ या चित्रपटात दिसणार आहे आणि या चित्रपटात तो एका क्रिकेटरचीच भूमिका साकारणार आहे, त्यामुळे हार्डी या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे.
हार्डी ‘83’द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे आणि या चित्रपटात तो माजी क्रिकेटपटू मदन लालची भूमिका साकारणार आहे. हार्डीचे पोस्टर चित्रपटातून रिलीज करण्यात आले आहे, जे खूप पसंतही करण्यात आले होते.
याशिवाय, काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, हार्डी हा आणखी एका बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे ज्याचे दिग्दर्शन रिभु दासगुप्ता करणार आहेत. चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. पण समोर आलेल्या कास्टिंग तपशीलांनुसार, हार्डी या चित्रपटात परिणीती चोप्रा, के के मेनन आणि रजित कपूरसोबत दिसणार आहे. हार्डीच्या चाहत्यांना आता त्याला लवकरच बॉलिवूडमध्ये पाहायचे आहे आणि ते त्याचे चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहेत.