मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) 29 ऑक्टोबरला तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ती बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. क्रिती खरबंदाने तिच्या करिअरची सुरुवात साऊथ सिनेमांमधून केली होती. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिच्याशी संबंधित खास गोष्टींची ओळख करून देणार आहोत.
अभिनेत्री क्रिती खरबंदा हिचा जन्म 29 ऑक्टोबर 1990 रोजी दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला. तिने सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतूनच पूर्ण केले. हायस्कूलनंतर, क्रिती खरबंदा संपूर्ण कुटुंब बंगळुरूला शिफ्ट झाले. तिने पुढील शिक्षण बंगळुरूमधूनच केले. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. क्रिती खरबंदा शाळा-महाविद्यालयात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत असे.
क्रिती खरबंदा हिने ज्वेलरी डिझायनिंगमध्ये डिप्लोमा केला आहे. पण क्रिती खरबंदा यांनी कॉलेजच्या काळापासून मॉडेलिंगला सुरुवात केली. तिने बराच काळ मॉडेलिंग केले. यादरम्यान क्रिती खरबंदा हिने अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केले. एका तमिळ चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. क्रिती खरबंदा पहिल्यांदा तमिळ चित्रपट ‘बोनी’मध्ये दिसली होती. हा चित्रपट 2009 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
क्रिती खरबंदा हिचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही, पण या चित्रपटातील तिच्या अभिनयाला चांगलीच पसंती मिळाली. ‘बोनी’ या चित्रपटानंतर अवघ्या वर्षभरातच क्रिती खरबंदाने कन्नड चित्रपटांमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आणि प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. क्रिती खरबंदाने चार वर्षांपूर्वी बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आहे.
क्रिती खरबंदाने इमरान हाश्मीच्या ‘राज: रीबूट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, तिचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकला नाही. यानंतर क्रिती खरबंदा ‘गेस्ट इन लंडन’ आणि ‘शादी में जरूर आना’ मध्ये दिसली. ‘शादी में जरूर आना’ हा चित्रपट क्रिती खरबंदाच्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत होता. त्यांचा हा चित्रपट सुपर हिट ठरला. आत्तापर्यंत क्रिती खरबंदा ‘वीरे दी वेडिंग’, ‘यमला पगला दीवाना फिर से’, ‘हाउसफुल 4’ आणि ‘पागलपंती’मध्ये दिसली आहे.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, क्रिती सध्या अभिनेता पुलकित सम्राटला डेट करत आहे आणि सोशल मीडियावर त्याच्यासोबतचे मनोरंजक फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे.
शाहरुख खानपासून ते रणबीर कपूरपर्यंत, ‘या’ बॉलिवूडकरांसाठी समीर वानखेडे ठरलेयत ‘दबंग’ अधिकारी!
डिजिटलच्या युगात सायकलवरून प्रोमोशन, ‘जयंती’साठी तरुणाचा मुंबई ते नागपूर सायकलवरून प्रवास!
अनन्या पांडेने सुरु केले ‘लायगर’चे चित्रीकरण, ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यामुळे लागला होता ब्रेक!