मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) हे एक असं नाव आहे, ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. संगीताच्या जगात हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. ‘भारतरत्न’ लता मंगेशकरांच्या आवाजात जादू आहे. त्यांच्याकडे दैवी प्रतिभा आहे, वगैरे असं आपण बऱ्याचदा ऐकतो, पण या सगळ्यात त्यांचा संघर्ष फार कमी अधोरेखित केला जातो.
लता मंगेशकर यांनी अशा वेळी गायला सुरुवात केली, जेव्हा तंत्रज्ञान इतके प्रगत नव्हते. म्युझिक रेकॉर्डिंग आणि मिक्सिंगसाठी इतकी प्रगत उपकरणे नव्हती. ‘महल’ मधील ‘आयेगा आने वाला’ या गाण्याने लता मंगेशकर यांना खूप प्रसिद्धी मिळवून दिली. फार कमी लोकांना माहिती आहे की या गाण्यातील आवाजाचा चढउतार कोणत्याही तंत्राच्या मदतीने तयार केला गेला नाही, तर तो एका विशेष प्रकारे रेकॉर्ड केला गेला. जर, तुम्हाला ते गाणे आठवत असेल, जेव्हा अशोक कुमार आरशासमोर उभे राहतात आणि गाणे सुरू होते, तेव्हा दुरून आवाज येऊ लागतो आणि नंतर तीन-चार ओळी नंतर ते जवळून आल्यासारखे वाटते. या प्रकारचा ध्वनी प्रभाव तंत्राच्या मदतीने तयार केला जाऊ शकतो, परंतु त्या वेळी गायकाला हे करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत होती.
लता मंगेशकर यांनी त्यांच्या एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते की, मायक्रोफोन खोलीच्या मध्यभागी ठेवण्यात आला होता आणि त्या खोलीच्या एका कोपऱ्यात उभ्या होत्या. ‘खामोश है जमाना’ या पहिल्या ओळी गाताना, लता मंगेशकर माईकच्या दिशेने पुढे जात असत आणि जेव्हा त्या माईकच्या समोर पोहचायच्या तेव्हा त्या ‘आयेगा आने वाला’ सुरू करायच्या.
हे काम इतके अवघड होते की, गाणे पूर्ण करण्यासाठी ही प्रक्रिया अनेक वेळा करावी लागली. हे गाणे खेमचंद प्रकाश यांनी संगीतबद्ध केले होते. ते रेकॉर्ड झाल्यानंतरही, या चित्रपटाचे निर्माते, सावक वाचा त्यावर समाधानी नव्हते आणि त्यांना वाटले की, हे गाणे लोकप्रिय होणार नाही. तर, इतर निर्माते अशोक कुमार यांचे मत वेगळे होते. अशी डझनभर उदाहरणे आहेत जेव्हा लता मंगेशकरांनी गाणी सुधारण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न केले होते.
1948-49 हे वर्ष असे आहे, जेव्हा लता मंगेशकर एका दिवसात आठ-आठ गाणी रेकॉर्ड करायच्या. त्या सकाळी दोन गाणी, दुपारी दोन गाणी, संध्याकाळी दोन गाणी आणि रात्री दोन गाणी रेकॉर्ड करायच्या. बऱ्याच वेळा असे घडायचे की, त्या सकाळी घरातून निघायच्या आणि रात्री उशिरा दोन-तीन वाजेपर्यंत घरी परतायच्या. खाण्यापिण्यासाठी देखील वेळ नव्हता. कधीकधी असे व्हायचे की गाण्याचे रेकॉर्डिंग व्हायचे आणि नंतर सांगण्यात यायचे की, रेकॉर्डिंग नीट झाले नाही, मग गायकाला पुन्हा बोलावले जायचे.
Shruti Marathe : श्रुती मराठेच्या ‘गोड गोजिरी अदा….’, फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल फिदा!