Happy Birthday Priyanka Chopra : बॉलिवूडच्या देसी गर्लचा वाढदिवस, चाहत्यांकडून शुभेच्छा, म्हणाले ‘आम्हाला तुमचा अभिमान आहे..’

| Updated on: Jul 18, 2021 | 10:35 AM

प्रियंकाच्या वाढदिवशी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. प्रत्येकजण तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय. (Happy Birthday Priyanka Chopra: Desi Girl Priyanka Chopra's Birthday, Fans says, 'We are proud of you ..')

Happy Birthday Priyanka Chopra : बॉलिवूडच्या देसी गर्लचा वाढदिवस, चाहत्यांकडून शुभेच्छा, म्हणाले आम्हाला तुमचा अभिमान आहे..
Follow us on

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा (Priyanka Chopra’s Birthday) आज वाढदिवस आहे. प्रियंकाच्या वाढदिवशी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. प्रत्येकजण तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय. याशिवाय तिचे कौतुक करत आहेत. काही तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत तर काही तिच्या कामाचं. त्याचबरोबर काही चाहत्यांनी हा दिवस ‘पीसी डे’ म्हणजेच प्रियंका चोप्राचा दिवस असं हॅशटॅग तयार केलं आहे. एवढंच नाही तर चाहत्यांकडून प्रियंकाचे आत्तापर्यंतचे सर्वोत्तम सीनही शेअर केले जात आहेत.

पाहा चाहत्यांच्या पोस्ट

वाढदिवसापूर्वी प्रियंकाची धमाल

वाढदिवसाच्या आधीच प्रियांकानं बर्‍यापैकी धमाल केली आहे. यादरम्यान तिनं ब्लॅक बिकिनी परिधान केली होती आणि ती तिचा टॅटू फ्लॉन्ट करताना दिसली.

‘सिटाडेल’च्या शूटिंगमध्ये व्यस्त

प्रियांका सध्या तिच्या आगामी ‘सिटाडेल’ या सिरीजसाठी शुटिंग करत आहे. ती सेटमधून फोटो शेअर करत असते. नुकतंच प्रियंकाने सिटाडेलच्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तिच्या चेहऱ्यावर रक्त होतं. प्रियंकाचा हा फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

ही सिरीज जो आणि अँथनी रुसो यांनी तयार केली आहे ज्यांनी अ‍ॅव्हेंजर्स इनफिनीटी वॉर केलं होतं. या मालिकेत रिचर्ड मॅडन प्रियंकासोबत दिसणार आहे. रिचर्ड गेम ऑफ थ्रोन्स आणि नेटफ्लिक्सची सिरीज बॉडीगार्डमध्ये दिसला आहे. यापूर्वी शूटिंग दरम्यान रिचर्ड आणि प्रियांकाचे फोटो व्हायरल झाले होते ज्यात दोघे अ‍ॅक्शन सीन्ससाठी शूटिंग करत होते. दोघांनाही पडद्यावर पाहून चाहते खूप उत्सुक आहेत.

संबंधित बातम्या

Love Story | साधी पण रोमँटिक, दिशा परमार-राहुल वैद्यची प्रेमकथा, जाणून घ्या कशी जमली दोघांची जोडी

Couple Goals : आयरा खानची रोमँटिक पोस्ट, बॉयफ्रेन्ड नुपूर शिखरेसोबतचे खास फोटो शेअर

‘अतिशय वाईट पद्धतीने लोक स्पर्श करायचे, बोलायची हिंमतही नव्हती..’, लोकांना हसवणाऱ्या भारतीच्या डोळ्यात आले अश्रू!