मुंबई : 70 ते 90च्या दशकापर्यंत अभिनेत्री राखी (Rakhee Gulzar) यांनी प्रेयसीपासून ते आईपर्यंतच्या प्रवासात प्रेक्षकांना तिची अनेक रूपे पडद्यावर दाखवली. 15 ऑगस्ट 1947 रोजी रानाघाट येथे जन्मलेली राखी यावर्षी आपला 75वा वाढदिवस साजरा करत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या दिवशी जन्मलेल्या राखी यांनी पडद्यावर आपल्या अनेक पात्रांसह प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
राखी पडद्यावरील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी देऊ केलेल्या भूमिका सहजपणे पडद्यावर साकारल्या आहेत. कधी त्या अमिताभ बच्चनच्या मैत्रीण बनल्या, तर कधी सचिव आणि जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी त्यांच्या आईची भूमिका देखील साकारली. राखीने पडद्यावर अनेक उत्तम चित्रपट केले, ज्यात ‘शर्मिली’, ‘कस्मे वादे’, ‘त्रिशूल’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘दुसरा आदमी’, ‘जुर्माना’, ‘करण-अर्जुन’, ‘बाजीगर’ यांचा समावेश आहे.
राखी यांची पडद्यावरील कारकीर्द अतिशय सुरेख होती, पण त्यांचे वैयक्तिक आयुष्य अशांततेने भरलेले होते. राखी अवघ्या 16 वर्षांच्या असताना त्यांनी बंगाली चित्रपट दिग्दर्शक आणि पत्रकार अजय बिस्वास यांच्याशी लग्न केले होते. सुरुवातीला सर्व काही ठीक होते, पण हळूहळू दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि नंतर दोघांचा घटस्फोट झाला. मात्र, अजयच्या संपर्कात आल्यानंतरच राखीचा चित्रपटांकडे कल वाढला.
बॉलिवूडमध्ये आल्यानंतर राखी यांची भेट गुलजार यांच्याशी झाली. गुलजार हे त्या काळात एक मोठे चित्रपट लेखक होते. या दरम्यान, राखी आणि गुलजार एका फिल्म पार्टीमध्ये भेटले आणि गुलजार एकाच नजरेत राखीच्या प्रेमात पडले. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 1973 साली लग्न केले. लग्नानंतर गुलजार यांनी एक अट घातली होती की, लग्नानंतर राखी चित्रपटांमध्ये काम करणे बंद करेल आणि राखीने त्याला होकार दिला.
लग्नानंतर दोघांना मेघना ही मुलगी झाली, ती आता एक यशस्वी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता बनली आहे. राखीने वचन दिले होते, पण त्यांचे मन पुन्हा चित्रपटांकडे जाऊ लागले. यानंतर, गुलजार जेव्हा ‘आंधी’ चित्रपटाच्या लोकेशनच्या शोधात काश्मीरला गेले, तेव्हा त्यांनी राखीलाही सोबत घेऊन गेले. असे म्हटले जाते की, जेव्हा चित्रपटाची संपूर्ण टीम तेथे पोहोचली तेव्हा एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये अभिनेता संजीवकुमारने खूप दारू प्यायली आणि नशेच्या अवस्थेत त्याने सुचित्रा सेनचा हात धरला.
गुलजार यांना हे सर्व आवडले नाही, म्हणून त्यांनी सुचित्राला तिथून बाहेर काढले आणि तिला एका खोलीत घेऊन गेले. तथापि, जेव्हा राखीने हे सर्व पाहिले, तेव्हा त्यांनी गुलजार यांना रागाने काही प्रश्न विचारले. गुलजार यांना याचा खूप राग आला आणि त्यांनी राखीसोबत वाद सुरु केला. या गोंधळात गुलजार यांनी राखी यांच्यावर हात उगारला. यानंतर गुलजार यांनी राखीची माफी देखील मागितली, पण त्या या गोष्टी कधी विसरू शकल्या नाहीत.
राखी आणि गुलजार लग्नाच्या काहीच काळानंतर वेगळे राहू लागले होते. मात्र, 2020 मध्ये राखी गुलजार आणि आपल्या कुटुंबासोबत होळी साजरी करताना दिसल्या होत्या. त्याच वेळी, समोर आलेल्या फोटोंमध्ये त्यांना ओळखणेही कठीण झाले होते.
कारगिलमध्ये शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्राच्या शौर्याची कथा, वाचा कसा आहे ‘शेरशाह’ चित्रपट
पत्नी वियोगाचं दुःख सहन होईना, ‘देवमाणूस’मधील ‘विजय’ने संपवले स्वतःचे आयुष्य!