मुंबई : साऊथचा सर्वोत्कृष्ट अभिनेता राणा दग्गुबाती (Rana Daggubati) आज (14 डिसेंबर) त्याचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे. राणा दग्गुबातीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी, ‘बाहुबली द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली 2’ या ब्लॉक बस्टर चित्रपटांमधील भल्लालदेवच्या भूमिकेत त्याची उत्कृष्ट कामगिरी विसरणे कठीण आहे. तसे, राणाचा अभिनेता बनण्याचा प्रवास खूप रंजक आहे आणि विशेषत: त्याची व्यक्तिरेखा अजूनही लोकांच्या लक्षात आहे.
राणा एकेकाळी चॉकलेट हिरो असला तरी, आता त्याचा लूक पूर्णपणे बदलला आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी…
राणा दग्गुबाती याचा जन्म 14 डिसेंबर 1984 रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव दग्गुबाती सुरेश बाबू आहे, ते तेलुगु चित्रपट निर्माते आहेत. त्याच्या आईचे नाव लक्ष्मी दग्गुबाती आहे. त्यांचे आजोबा, तेलुगु चित्रपट निर्माते डी. रामनायडू यांना देशाचा सर्वोच्च सन्मान ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचे काका व्यंकटेश आणि नागा चैतन्य हे तेलुगु चित्रपटातील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहेत.
राणा याने कोनिक इन्स्टिट्यूट ऑफ इमेजिंग अँड टेक्नॉलॉजीमधून फोटोग्राफीचे उत्तम तंत्र शिकले आहे. यानंतर त्याने चेन्नईमध्ये अनेक माहितीपट आणि जाहिरातींची निर्मिती केली. राणा चेन्नईहून हैदराबादला गेला आणि वडिलांचे प्रोडक्शन हाऊस सांभाळू लागला. इथे आल्यावर त्याने काका आणि वडिलांकडून कला, चित्रपट निर्मिती या विषयांचे ज्ञान घेतले.
राणा दग्गुबाती याने 2010 साली जेव्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते, तो चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जात होता. राणा दग्गुबातीने 2010 मध्ये राजकीय थ्रिलर चित्रपट ‘लीडर’मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटानंतर त्याला टाईम्स ऑफ इंडियाचा दहावा ‘मोस्ट डिझायरेबल मॅन’ ही पदवी दिली होती.
साऊथ चित्रपटांशिवाय त्याने बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपट केले आहेत. राणा अक्षय कुमारच्या ‘बेबी’ आणि ‘दम मारो दम’मध्ये अभिषेक बच्चन आणि बिपाशासोबत दिसला आहे. ‘बोमलता अ बेलीफुल ऑफ ड्रीम’ या चित्रपटासाठी राणाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
राणा दग्गुबाती हा केवळ अभिनेताच नाही तर एक यशस्वी निर्माताही आहे. यासोबतच त्याला व्हिज्युअल इफेक्ट को-ऑर्डिनेटर आणि फोटोग्राफीचीही आवड आहे. राणा गग्गुबातीने काही दिवसांपूर्वी एका टीव्ही मुलाखतीदरम्यान असा खुलासा केला होता की, तो ऐकून लोक हैराण झाले होते. राणाने दक्षिण भारतीय टीव्ही चॅनल जेमिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तो लहानपणापासून एका डोळ्याने पाहू शकत नाही. मी डावा डोळा बंद केला तर मला काहीच दिसणार नाही, असे राणा म्हणाला.
राणाने सांगितले की, तो लहानपणापासून उजव्या डोळ्याने पाहू शकत नाही. त्याच्यासाठी वर्षानुवर्षे आयुष्य अजिबात सोपे नव्हते. त्यानंतर प्रसिद्ध डॉक्टर एलव्ही प्रसाद यांनी त्याच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली. एका मुलाकडून त्याला उजवा डोळा दान करण्यात आला. मात्र, हा डोळा लावूनही त्याची दृष्टी परत आली नाही. राणा फक्त एका डोळ्याने पाहू शकतो, हे इतकी वर्ष कोणालाच माहीत नव्हती.
Mouni Roy | निळ्याशार समुद्र किनारी मौनी रॉयचा जलवा, बिकिनी लूकने चाहत्यांना केलेय घायाळ!
Video | असं काय झालं की, सारा अली खानला जान्हवी कपूरसोबत टॅक्सीत बसून घरी जावे लागले?