Happy Birthday Satish Shah | दूरदर्शनच्या शोमध्ये सतीश शहांनी साकारलेल्या तब्बल 60 भूमिका, जाणून घ्या त्यांच्यासंबंधित काही खास गोष्टी…

| Updated on: Jun 25, 2021 | 10:38 AM

प्रसिद्ध अभिनेता सतीश शाह (Satish Shah) आपल्या कॉमिक टायमिंगबद्दल खूप प्रसिद्ध आहेत. सतीश शाह यांचे पूर्ण नाव सतीश रविलाल शाह आहे. आपल्या विनोदी अभिनयाने चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारे सतीश कौशिक यांचा आज (25 जून) वाढदिवस आहे.

Happy Birthday Satish Shah | दूरदर्शनच्या शोमध्ये सतीश शहांनी साकारलेल्या तब्बल 60 भूमिका, जाणून घ्या त्यांच्यासंबंधित काही खास गोष्टी...
सतीश कौशिक
Follow us on

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता सतीश शाह (Satish Shah) आपल्या कॉमिक टायमिंगबद्दल खूप प्रसिद्ध आहेत. सतीश शाह यांचे पूर्ण नाव सतीश रविलाल शाह आहे. आपल्या विनोदी अभिनयाने चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारे सतीश कौशिक यांचा आज (25 जून) वाढदिवस आहे. सतीश यांनी 1970मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. हिंदी व्यतिरिक्त या अभिनेत्याने अनेक मराठी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे (Happy Birthday Satish Shah Know about actors career journey).

सतीश शाह यांचा जन्म 25 जून 1951 रोजी गुजरातच्या मांडवी कच्छ येथे झाला. गुजरातमधून बाहेर पडत या अभिनेत्याने सिनेमाच्या जगात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चला तर त्यांच्या जीवनातील काही खास गोष्टींबद्दल जाणून घेऊया…

‘या’ मालिकेतून सतीशला मिळाली ओळख

1980मध्ये दूरदर्शनवर आलेल्या ‘ये जो जिंदगी’ या मालिकेतून सतीश शाह यांना त्यांची खरी ओळख मिळाली. या सीरियलला त्या काळात प्रचंड यश मिळालं. सतीशची ही दमदार मालिका दिग्दर्शक कुंदन शहा यांनी बनवली होती. खास गोष्ट म्हणजे या शोमध्ये ते 60हून अधिक पात्रे साकारताना दिसला. या शोमध्ये त्याने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत सतीशने आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. याशिवाय सतीश शाह यांनी दूरदर्शनच्या ‘ऑल द बेस्ट’ आणि ‘नहले पे दहला’ या कार्यक्रमातही काम केले आहे.

‘या’ चित्रपटात उमटला अभिनयाचा ठसा

सतीशने ‘अरविंद देसाई की अजब दास्तान’ या चित्रपटाद्वारे मनोरंजन विश्वात पदार्पण केले आहे. पण ज्या चित्रपटासाठी अभिनेत्याचे कौतुक झाले तो म्हणजे ‘जाने भी दो यारों’. 1984 साली रिलीज झालेल्या ‘जाने भी दो यारों’ या चित्रपटात सतीश शाह खास भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात ते मनपा आयुक्त डीमेलोच्या भूमिकेत दिसले होते, जी भूमिका चाहते आजपर्यंत विसरलेले नाहीत.

खऱ्या आयुष्यातही त्याच नावाने ओळखले जाऊ लागले…

चाहत्यांना सतीश खासकरुन ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेमुळे ओळखतात. या प्रसिद्ध कार्यक्रमात सतीश शहा इंद्रवदनच्या भूमिकेत दिसले होते. त्यांच्या भूमिकेला चाहत्यांनी खूप पसंती दिली होती. चाहते आजही त्याला इंद्रवदन या नावाने अधिक ओळखतात.

सतीश शाहने आपल्या कारकीर्दीत अनेक उत्तम चित्रपटांत काम केले. या अभिनेत्याने ‘अनोखा रिश्ता’, ‘मालामाल’, ‘हम साथ साथ हैं’, ‘हम आपके हैं कौन’, ‘आग और शोला’, ‘धर्मसंकट’, ‘घर की इज्जत’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ आणि ‘मैं हूं’ मध्ये काम केले आहे. सतीशचे चाहते अजूनही त्यांच्या अभिनयाचे दिवाने आहेत.

(Happy Birthday Satish Shah Know about actors career journey)

हेही वाचा :

मॅटाडोर, गन आणि फिरते रेस्टॉरंट, असा चित्रित झाला ‘नसीब’ चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन!

Photo : बिग बॉसमध्ये परिधान केलेल्या गाऊनचा लिलाव करणार रुबिना दिलैक, वाचा काय आहे कारण…