मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सयानी गुप्ता (Sayani Gupta) तिच्या वेगळ्या व्यक्तिरेखेसाठी ओळखली जाते. तिने चौकटीबाहेरच्या भूमिका सकारात लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. सयानी गुप्ता हिचा जन्म 9 ऑक्टोबर 1985 रोजी कोलकाता, पश्चिम बंगाल येथे झाला. सयानी आज (9 ऑक्टोबर) आपला 36वा वाढदिवस साजरा करत आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने 2012मध्ये बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. सयानीने तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘सेकंड मॅरेज डॉट कॉम’ या चित्रपटातून केली. सयानीने शाहरुख खानसोबत ‘फॅन’ या चित्रपटामध्ये काम केले आहे.
सयानी गुप्ताने ‘जॉली एलएलबी 2’, ‘आर्टिकल 15’ आणि ‘फोर मोअर शॉट्स’सारख्या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. सायनीला फेसबुकच्या माध्यमातून शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली, ज्याबद्दल तिने एका मुलाखतीत सांगितले होते.
सयानीने एका मुलाखतीत सांगितले होते की, एका रात्री ती फेसबुकवर असेच काही मेसेज तपासत होती. शानूचा न वाचलेला संदेश पाहून तिला धक्का बसला. शानू यशराज फिल्म्सचा कास्टिंग डायरेक्टर आहे. त्याचा मेसेज होता की, तुम्ही आमच्या कार्यालयात आम्हाला भेटायला येऊ शकता का? तिने खूप उशीरा हा संदेश पाहिला होता. त्यांनी विचारलेली मुदत संपली होती. त्यानंतर तिने त्या मेसेजकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर पुन्हा तिला मेसेज आला की, तुम्ही आहात का? जर तुम्ही हा मेसेज पाहिला असेल, तर आम्हाला भेट द्या.
सयानीने सांगितले की, या संदेशानंतर मी शानूच्या कार्यालयात त्याला भेटायला गेलो. त्यानंतर ऑडिशनची प्रक्रिया सुरू झाली. पण, संपूर्ण वेळ जेव्हा मी चित्रपटासाठी ऑडिशन देत होते, तेव्हा मला माहित नव्हते की चित्रपट कशाबद्दल आहे आणि कथानक काय आहे. मला एवढेच माहीत होते की, हा यशराजचा चित्रपट आहे. मला माहितही नव्हते की, शाहरुख खान या चित्रपटाचा एक भाग असणार आहे.
त्यानंतर मला फोन आला की मला हा चित्रपट मिळाला आहे आणि शाहरुख खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत असेल. हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होते. माझा विश्वास बसत नव्हता की, मी शाहरुख खानसोबत काम करणार आहे. सयानीने या चित्रपटात आर्यनच्या व्यवस्थापकाची भूमिका केली होती.
Imtiaz Kharti : बॉलिवूडमधील सर्वात बडा मासा गळाला, NCB ची इम्तियाज खत्रीवर धाड
कोण होता ‘तो’ व्यक्ती, जो एक गाणं ऐकण्यासाठी रोज लता मंगेशकरांना फोन करायचा! वाचा किस्साhttps://t.co/dhcsfxSeET
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 9, 2021