Happy Birthday Shah Rukh Khan | ‘किंग खान’ शाहरुखला का मिळाली ‘बादशाह’ ही ओळख? तुम्हाला माहितीये का?

| Updated on: Nov 02, 2021 | 9:34 AM

अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्यासाठी आजचा दिवस (2 नोव्हेंबर) खूप खास आहे. कारण, आज अभिनेता वयाची 55 वर्षे पूर्ण करत आहे. शाहरुख खानने इंडस्ट्रीत जे स्थान मिळवले आहे, काही लोक त्याची केवळ कल्पनाच करू शकतात.

Happy Birthday Shah Rukh Khan | ‘किंग खान’ शाहरुखला का मिळाली ‘बादशाह’ ही ओळख? तुम्हाला माहितीये का?
Shah Rukh Khan
Follow us on

मुंबई : अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्यासाठी आजचा दिवस (2 नोव्हेंबर) खूप खास आहे. कारण, आज अभिनेता वयाची 55 वर्षे पूर्ण करत आहे. शाहरुख खानने इंडस्ट्रीत जे स्थान मिळवले आहे, काही लोक त्याची केवळ कल्पनाच करू शकतात. आज जरी शाहरुख चित्रपटांपासून ब्रेकवर असला, तरी एक काळ असा होता जेव्हा शाहरुखचा पडद्यावर मोठा दबदबा होता. हे स्टारडम आजही कमी झालेले नाही. शाहरुख हा बॉलिवूडचा असाच एक अभिनेता आहे ज्याने पडद्यावर नकारात्मक भूमिका करूनही लोकांना दाखवून दिले होते की, खलनायक गाणे गाऊ शकतो आणि जीव देखील घेऊ शकतो.

त्याचबरोबर कॉमेडी आणि अॅक्शन सीन्सनेही त्याला ‘बॉलिवूडचा किंग खान’ का म्हटले जाते हे देखील सिद्ध केले आहे. ‘किंग खान’च नाही तर शाहरुखही इंडस्ट्रीत ‘बादशाह’ या नावाने प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे ज्या चित्रपटातून शाहरुखला इंडस्ट्रीत एवढी मोठी ओळख मिळाली, तो चित्रपट रिलीजच्या वेळीच पडद्यावर फ्लॉप झाला होता. शाहरुखचा ‘बादशाह’ हा चित्रपट त्यावेळी प्रेक्षकांना आवडला नव्हता, पण आजही हा चित्रपट टीव्हीवर खूप पसंत केला जातोय.

मोठ्या पडद्यावर नाही, तर छोट्या पडद्यावर दाखवली किमया!

1999 मध्ये, ‘बादशाह’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, जो शाहरुखचा त्या वर्षातील पहिला आणि शेवटचा चित्रपट होता. याआधी शाहरुखने ‘बाजीगर’मधूने लोकांची मने जिंकली होती. ‘बादशाह’ या चित्रपटाचा प्रोमोही खूप पसंत केला गेला होता, पण जेव्हा हा चित्रपट जेव्हा पडद्यावर आला तेव्हा लोकांना तो फारसा आवडला नाही. मोठ्या पडद्यावर त्याचा व्यवसाय सरासरी होता, पण टीव्हीवर चित्रपटाला जबरदस्त टीआरपी मिळाला आणि तो कल्ट क्लासिक चित्रपट बनला.

चित्रपट फ्लॉप होण्याचीही अनेक कारणे!

त्याचवेळी हा चित्रपट फ्लॉप होण्याचीही अनेक कारणे होती. पहिली गोष्ट म्हणजे चित्रपटाचे प्रमोशन नीट झाले नव्हते. ट्रेलर आणि पोस्टरमध्ये सगळीकडे हा चित्रपट अ‍ॅक्शनपट असल्याचे दिसत होते. सर्व अॅक्शनप्रेमी सिनेमागृहात जमले होते, पण जेव्हा त्यांना पडद्यावर भरपूर कॉमेडी पाहायला मिळाली तेव्हा त्यांची निराशा झाली.

त्याकाळी प्रेक्षकांच्या तोंडी स्तुतीचे शब्द फार खास मानले जात असायचे. चित्रपट चांगला नाही असे एकदा लोकांनी म्हटले, तर बाकीचे लोकही चित्रपटगृहात जायचे नाहीत. असेच काहीसे या चित्रपटाच्या बाबतीतही घडले आहे. दुसरे कारण म्हणजे त्या काळात पूर्णपणे विनोदी चित्रपट आले नव्हते. लोकांना सूरज बडजात्याच्या फॅमिली ड्रामामध्ये जास्त रस होता.

नायकाची कॉमेडी ठरली कारण

त्यावेळी जॉनी लीव्हरच्या कॉमेडीला प्राधान्य दिले जात असे. तो प्रत्येक चित्रपटाचा भाग असायचा आणि प्रकरण गंभीर असे की ते हलकेच करण्याचे काम जॉनी लिव्हर करत असे. लोकांना विनोदाचीही तितकीच सवय होती. बादशाहमध्ये जॉनीही होता, पण यावेळी तो एकटा हसत नव्हता, तर चित्रपटाचा नायक स्वत: जबरदस्त कॉमेडी करत होता आणि त्यावेळी लोकांना ते पटले नाही.

नायिकेला मिळाली प्रसिद्धी

जेव्हा या चित्रपटासाठी शाहरुखची नायिका शोधण्याची वेळ आली, तेव्हा मनीषा कोईराला, करिश्मा कपूर आणि शिल्पा शेट्टी यांना विचारता विचारता ट्विंकल खन्नाला ही भूमिका मिळाली. या चित्रपटात तिला शाहरुखच्या नायिकेच्या भूमिकेतच दिसावे लागले, असे नाही तर ती स्वतः एक गुप्तहेर होती. हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले होते. शाहरुख आणि ट्विंकलची जोडीही लोकांना आवडली होती. हा चित्रपट त्यावेळी बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नसला, तरी टीव्हीवर मात्र त्याने यशाचा झेंडा रोवला. टीव्हीच्या पडद्यावर ‘बादशाह’ हिट ठरला आणि खऱ्या आयुष्यातही शाहरुख खान प्रेक्षकांचा लाडका ‘बादशाह’ बनला!

हेही वाचा :

आधी मारहाणीचा आरोप, मग घटस्फोट, आता स्नेहा वाघ पूर्वपतीला म्हणतेय ‘मला तुझ्या लग्नाला बोलव!’

Abhishek-Aishwarya Love Story | चित्रपटात काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले, वाचा कशी होती अभिषेक-ऐश्वर्याची प्रेमकथा…