मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध स्टार किड तुषार कपूरचा (Tusshar Kapoor) आज (20 नोव्हेंबर) वाढदिवस आहे. जितेंद्र यांचा मुलगा तुषार आज 45वा वाढदिवस साजरा करत आहे. तुषारने मिशिगन विद्यापीठातून त्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. तुषारने 2001 मध्ये ‘मुझे कुछ कहना है’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात तुषारने करीनासोबत काम केले होते.
तुषारला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. यानंतर तुषारने ‘क्या दिल ने कहा’, ‘ये दिल’, ‘जीना सिर्फ मेरे लिए’ आणि ‘कुछ तो है’ सारखे चित्रपट केले. मात्र, तुषारचे हे सर्व चित्रपट सातत्याने फ्लॉप झाले. 2004 मध्ये तुषारने ‘गायब’ चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला आणि त्याच्या कामाचे कौतुकही झाले.
‘गायब’ प्रदर्शित झाला तेव्हापासून इंडस्ट्रीत त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली. 2006 मध्ये तुषारने रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल’ चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. तुषारने या चित्रपटाच्या दोन्ही सिक्वेलमध्येही काम केले आहे. यानंतर तुषारने काही वर्षे चित्रपटात काम करणे टाळले. या काळात त्याने फक्त कुटुंबासाठी वेळ दिला.
2011 मध्ये तुषारने ‘डर्टी पिक्चर’ चित्रपटातून पुनरागमन केले. या चित्रपटात त्याने छोटीशी भूमिका केली होती. दरम्यान, ‘खाकी’, ‘शूट आउट अॅट वडाळा’ यांसारख्या यशस्वी हिट’
काही काळापूर्वी तुषार कपूर वडील झाल्याच्या बातमीने इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती. तुषारचे अजून लग्न झालेले नाही, पण तो एका मुलाचा ‘सिंगल फादर’ झाला आहे. तुषारने यासाठी इन विट्रो फर्टिलायझेशनचा अवलंब केला आहे. तुषारने आपल्या मुलाचे नाव ‘लक्ष्य’ ठेवले आहे.
वडील झाल्यानंतर तुषार खूप आनंदी झाला होता. एका निवेदनात त्याने म्हटले होते की, मला खूप दिवसांपासून वडील बनण्याची इच्छा होती. याबाबत तुषारचे वडील जितेंद्र यांनी म्हटले होती की, कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन झाले आहे. दुसरीकडे तुषारची आई शोभा कपूरही आजी झाल्यानंतर खूप आनंदी होत्या.
तुषारच्या निर्णयाला आम्ही सर्वांनी पाठिंबा दिल्याचे शोभा म्हणाल्या होत्या. आजी-आजोबा होण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. आमच्या कुटुंबासाठी हा मोठा आशीर्वाद आहे. सध्या तुषार त्याच्या मुलासोबत व्यस्त आहे. तो नेहमी लक्ष्याभोवती असतो आणि त्याची काळजी घेतो.