मुंबई : संगीतकार-गायक विशाल दादलानी (Vishal Dadlani) हा सध्याचा संगीताच्या जगात चमकणारा एक सुपरस्टार आहे. आज (28 जून) विशाल त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. बऱ्याच चित्रपटांना संगीत देण्याबरोबरच विशाल एक उत्तम गायक देखील आहे. विशालने 1994मध्ये आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती (Happy Birthday Vishal Dadlani know about his career journey).
विशाल दादलानीने 4 जणांचा ‘पेंटाग्राम’ नावाचा बँड सुरू केला होता. विशालचा हा ग्रुप सर्वत्र प्रसिद्ध झाला होता. हळू हळू विशालने आपल्या गाण्यांनी चाहत्यांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. आता विशाल रियॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारत आहे.
जेव्हा जेव्हा विशालचे नाव घेतले जाते, तेव्हा शेखर यांचे नाव देखील सोबत येते. विशाल आणि शेखरची जोडी बऱ्याच काळापासून चाहत्यांसमोर नव्या चालीचे संगीत सादर करत आहे. स्वत: विशालने एका मुलाखतीत म्हंटले होते की, तो आणि शेखर दोघेही ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटात एकत्र काम करत होते. यावेळीच त्या दोघांनीही नेहमी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला होता.
विशालने आपल्या आवाजाने बऱ्याच गाण्यांना साज चढवला आहे. विशालने आपल्या दमदार आवाजाने काही गाणी चाहत्यांमध्ये खूपच प्रसिद्ध केली आहेत.
‘बँग बँग’ या चित्रपटामध्ये हृतिक रोशन आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाचे ‘तू मेरी’ हे गाणे चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध झाले होते, हे गाणे विशालने गायले होते.
‘वॉर’ या चित्रपटात विशालने बेनीबरोबर ‘जय जय शिवशंकर’ हे गाणे गायले आहे. हे गाणे सोशल मीडियावर बरेच चर्चेत आले होते.
2014 मधील सुपरहिट फिल्म ‘मेरी कोम’ चाहत्यांना चांगलीच आवडली होती. या चित्रपटाचे ‘जिद्दी दिल’ हे गाणे विशालने गायले होते. हे गाणे शशी सुमन यांनी संगीतबद्ध केले होते.
‘तीस मार खाँ’ या चित्रपटाचे ‘शीला की जवानी’ हे गाणे आजपर्यंत चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हे गाणे सुनिधीसह विशालने देखील गायले होते.
विशालने शेखरबरोबर गायक-संगीतकार जोडी म्हणून ‘एक अजनबी’, ‘डर्टी पिक्चर’, ‘बँग-बँग’, ‘ओम शांती ओम’, ‘हॅपी न्यू इयर’, ‘रा-वन’, ‘शादी के लड्डू’, ‘शब्द’, ‘सलाम-नमस्ते’, ‘टशन’, ‘तीस मार खाँ’, ‘हॅटट्रिक’, ‘नॉक आउट’, ‘वी आर फॅमिली’, ‘लंडन ड्रीम्स’, ‘कुर्बान’, ‘कमिने’, ‘दोस्ताना’, ‘दस’, ‘ब्लफमास्टर’, ‘कांटे’, ‘कहानी’, ‘अंजना-अंजनी’, ‘दे ताली’ अशा बर्याच चित्रपटात काम केले आहे.
(Happy Birthday Vishal Dadlani know about his career journey)
Photo : निक्की तांबोळीचा सोशल मीडियावर जलवा, ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये फोटो शेअर