Happy Birthday Zarina Wahab | ‘चितचोर’ ते ‘सावन को आने दो’, झरीना वहाबचे सुपरहिट चित्रपट ज्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने!

| Updated on: Jul 17, 2021 | 10:54 AM

बॉलिवूडच्या जगात आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री झरीना वहाब (Zarina Wahab) आज (17 जुलै) आपला 62वा वाढदिवस साजरा करत आहे.

Happy Birthday Zarina Wahab | ‘चितचोर’ ते ‘सावन को आने दो’, झरीना वहाबचे सुपरहिट चित्रपट ज्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने!
झरीना वहाब
Follow us on

मुंबई : बॉलिवूडच्या जगात आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री झरीना वहाब (Zarina Wahab) आज (17 जुलै) आपला 62वा वाढदिवस साजरा करत आहे. झरीनाचा जन्म 17 जुलै 1959 रोजी विशाखापट्टणममध्ये झाला होता. अभिनेत्रीने 80 आणि 90च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ती बर्‍याच भाषांमध्ये निपुण आहे.

झरीनाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी खूप संघर्ष केला. तिच्या गडद रंग आणि लूकमुळे अनेक चित्रपट तिच्या हातातून निसटले. पण तिने हार मानली नाही व ती प्रयत्न करत राहिली. जरीना याआधी ‘गुड्डी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार होती. परंतु, हा चित्रपट तिच्या हातातून निघून गेला आणि जया बच्चनच्या हाती आला. झरीनाला पुन्हा ‘चितचोर’ या चित्रपटातून ओळख मिळाली. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकजण तिच्या अभिनयाचा दिवाना झाला होता.

चितचोर

‘चितचोर’मध्ये झरीनासोबत अमोल पालेकर मुख्य भूमिकेत दिसले होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला. यानंतर झरीना आणि अमोलने बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

सावन को आने दो

‘सावन को आने दो’ या चित्रपटात अरुण गोविल झरीनासमवेत मुख्य भूमिकेत दिसले होता. याशिवाय या चित्रपटात अमरीश पुरी देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होता. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. त्याची गाणीही चांगलीच गाजली.

घरौंदा

झरीना वहाब आणि अमोल पालेकर यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यातील एक ‘घरौंदा’ देखील आहे. झरीनाचा हा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. या चित्रपटाने त्यावेळी अनेक पुरस्कार जिंकले होते.

जज्बात

झरीनाने बर्‍याच सेलेब्सबरोबर काम केले आहे. राज बब्बरसोबत ती ‘जज्बात’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला होता.

गोपाल कृष्ण

झरीना वहाब आणि सचिन पिळगावकर यांनी ‘गोपाल कृष्णा’ या चित्रपटात काम केले होते. राजश्री प्रॉडक्शन अंतर्गत बनवलेल्या या चित्रपटात झरीना राधाच्या भूमिकेत दिसली होती.

(Happy Birthday Zarina Wahab actress best films from Bollywood)

हेही वाचा :

Katrina Kaif Net Worth | दमदार अभिनयासोबतच बक्कळ कमाई करते कतरिना कैफ, जाणून घ्या संपत्ती किती?

Kareena Kapoor | ‘तैमूरचं डायपर देखील बदलता येत नव्हतं’, ‘परफेक्ट’ आई होण्याबद्दल सांगताना करीना कपूर म्हणते…