‘मीम्स ही मीम्स होंगे’; Hera Pheri 3 जाहीर होताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

| Updated on: Jun 24, 2022 | 5:32 PM

अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'हेरा फेरी'चा तिसरा भाग (Hera Pheri 3) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माते फिरोज नाडियादवाला (Firoz Nadiadwala) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दलची माहिती दिली.

मीम्स ही मीम्स होंगे; Hera Pheri 3 जाहीर होताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Image Credit source: Twitter
Follow us on

बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, जे कितीही वेळा पाहिले तरी कंटाळवाणे वाटत नाही. प्रत्येक वेळी ते चाहत्यांना खळखळून हसवतात आणि त्यांचं मनोरंजन करतात. ‘हेरा फेरी’ असाच एक चित्रपट आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग ‘फिर हेरा फेरी’लाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ‘फिर हेरा फेरी’ची कथा अशा ठिकाणी येऊन संपते, जिथे प्रेक्षकांना पुढे काय घडणार याची उत्सुकता असते. मात्र हेरा फेरीचा तिसरा भाग गेल्या अनेक वर्षांपासून लांबणीवर टाकण्यात आला. आता अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘हेरा फेरी’चा तिसरा भाग (Hera Pheri 3) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माते फिरोज नाडियादवाला (Firoz Nadiadwala) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दलची माहिती दिली. ‘हेरा फेरी 3’मध्ये पहिल्या दोन भागातील कलाकारच मुख्य भूमिका साकारतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. सोशल मीडियावर याबद्दलचं वृत्त व्हायरल होताच त्यावरून भन्नाट मीम्स (Hera Pheri Memes) शेअर केले जात आहेत.

‘हेरा फेरी’ चित्रपटातील अनेक डायलॉग्स आजवर मीम्सच्या रुपात सोशल मीडियावर व्हायरल झाले. प्रसंग राजकीय असो किंवा आणखी कुठला.. सोशल मीडियावर हेरा फेरीचे मीम्स आवर्जून पहायला मिळतात. आता पुन्हा एकदा हे मीम्स व्हायरल झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा मीम्स-

“अक्षयजी, परेश भाई आणि सुनील जी या भूमिकांसोबतच तुम्हाला लवकरच हेरा फेरी 3 पहायला मिळेल. आम्ही सध्या कथेवर काम करत आहोत. त्यात काही बदल सुचवले आहेत. पहिल्या दोन चित्रपटांना मिळालेलं यश आम्ही गृहित धरू शकत नाही. त्यामुळे तिसऱ्या भागाच्या कथेविषयी, भूमिकांविषयी आम्ही अधिक जागरूक आहोत”, असं फिरोज ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

2000 मध्ये ‘हेरा फेरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर सहा वर्षांनी ‘फिर हेरा फेरी’ प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळालं. पहिल्या भागाचं दिग्दर्शन प्रियदर्शनने केलं होतं, तर सीक्वेलचं लेखन आणि दिग्दर्शन नीरज वोहराने केलं होतं. 2014 मध्येच ‘हेरा फेरी 3’च्या कथेवर काम सुरू झालं होतं, मात्र नीरज आजारी पडल्याने काम रखडल्याचं नाडियादवालांनी स्पष्ट केलं.