नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे अनेकांनी या चित्रपटाच्या कथेचं, त्यातील गाण्यांचं, अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) आणि नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या कामाचं कौतुक केलं. तर दुसरीकडे लेखिका शेफाली वैद्य यांनी नागराज मंजुळे आणि त्यांच्या चित्रपटावर टीका केली. “इतका राग होता ‘उच्चवर्णिय प्रस्थापितांवर’ तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला?”, असा सवाल त्यांनी केला. शेफाली यांच्या या पोस्टवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या ट्विटरवॉरनंतर सोशल मीडियावर ‘झुंड’ चित्रपटाबाबत काही भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. या मीम्सद्वारे नागराज यांच्या चाहत्यांनी शेफाली यांना उत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे विविध मीम्स पोट धरून हसवणारे आहेत. (Jhund Memes)
एका मीममध्ये मैफिलीत बसल्यासारखा नागराज यांचा फोटो एडिट करून त्यावर ‘आग ऐसी लगाई मजा आ गया’ , असं लिहिलं आहे. शेफाली वैद्य यांना हे उत्तर असल्याचं म्हटलं जात आहे.
आणखी एका मीममध्ये उपरोधिकपणे लिहिलं आहे, ‘माणुसकीच्या शत्रूसंगे ‘झुंड’ आमुचे सुरू’.
रजनीकांत यांच्या एका चित्रपटातील सीनला एडिट करून त्यावर नागराज यांचा फोटो पोस्ट करत लिहिलंय, ‘नागराज सर अख्ख्या बॉलिवूडला…क्यू हिला डाला ना?’
‘झुंड’ची पहिल्या दोन दिवसांची एकूण कमाई- 3.60 कोटी रुपये
हेही वाचा:
‘जात.. जात नाही तोवर…’; नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’वर टीका करणाऱ्यांना केदार शिंदेंचं सडेतोड उत्तर
‘नागराज मंजुळे भावा.. त्या ओळी मनातून जातच नाहीत’; ‘झुंड’साठी सिद्धार्थने लिहिलेली पोस्ट वाचली का?