मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांची मुख्य भूमिका असलेला ‘झुंड‘ (Jhund) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. दिगदर्शकांसाठी या सिनेमाचं स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगनंतर या दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) जेव्हा थिएटर बाहेर आले तेव्हा त्यांनी नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांना मिठी मारली. त्यावेळी त्यांच्या एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू होते. “मी आतापर्यंत पाहिलेल्या सिनेमांमध्ये झुंड हा सर्वाधिक चांगला सिनेमा आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांच्या रांगा लागतील”, असं म्हणालेत. तसंच “हा सिनेमा पाहिल्यानंतर मला पुन्हा एकदा जाऊन फिल्ममेकिंग शिकावंस वाटतंय”, असं अनुराग म्हणाले.
“पुन्हा फिल्ममेकिंग शिकावंस वाटतंय”
झुंड पाहिल्यानंतर अनुराग कश्यप भावूक झाल्याचं पहायला मिळालं. त्यांनी नागराज मंजुळे यांना मिठी मारून सिनेमा किती चांगला झालाय हे सांगितलं. “हा सिनेमा पाहिल्यानंतर मला पुन्हा एकदा जाऊन फिल्ममेकिंग शिकावंस वाटतंय”, असं अनुराग म्हणाले. तसंच “हा सिनेमा कमाल आहे. या सिनेमाच्या कास्टिंग डिरेक्टरला विशेष पुरस्कार दिला पाहिजे कारण सिनेमातील कास्ट अप्रतिम आहे”, असंही अनुराग म्हणाले.
इतर दिग्दर्शक काय म्हणाले?
‘झुंड’ हा सिनेमा पाहिल्यानंतर दिग्दर्शकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांनी “प्रत्येक भारतीयाने हा सिनेमा बघायला पाहिजे”, असं म्हटलंय. “एका वेगळ्याच लेव्हलचा हा सिनेमा आहे”, असं संदीप वैद्य यांनी म्हटलंय.तर मिलोप झवेरी यांनी “झुंड हा मास्टर पीस असल्याचं म्हटलंय”. तर “भारताकडून हा सिनेमा ऑस्करसाठी नॉमिनेट झाला पाहिजे”, असं एका दिग्दर्शकाने म्हटलंय.
सिनेमा गोष्ट
हा सिनेमा झोपडपट्टीत राहणारी मुलं आणि त्यांचे क्रीडा प्रशिक्षक यांच्यावर बेतलेला आहे. अमिताभ बच्चन हे क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या सिनेमाची कथा आहे. सत्यकथेवर आधारित हा सिनेमा आहे. नागराज मंजुळे यांना या सिनेमाची कथा लिहिण्यासाठी दोन वर्षांचा वेळ लागला. या चित्रपटाची कथा लिहिताना अमिताभ बच्चन यांना डोळ्यासमोर ठेवून या सिनेमातील प्रशिक्षकाचं पात्र नागराज मंजुळे यांनी लिहिलं आणि आता स्वत: अमिताभ बच्चन यांनी साकारलेलं विजय बारसे हे पात्र घेऊन सिनेमा 4 मार्चला प्रदर्शित होतोय. हा सिनेमा विजय बारसे आणि त्यांचे शिष्य यांच्यावर आधारित आहे.
संबंधित बातम्या
Jhund: नागराजच्या झुंडवर कोर्टात निर्णय, निर्मात्याला 10 लाखाचा दंड, सिनेमा स्थगितीचीही मागणी
लेखक नशा करून, गांजा मारून लिहितात का? ट्रोलिंगवर ‘आई कुठे काय करते’च्या लेखिकेचा परखड सवाल