मुंबई : हनी सिंह त्याच्या पर्सनल लाईफमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच हनी सिंह याने पत्नीसोबत घटस्फोट घेतला आहे. विशेष म्हणजे आता दुसऱ्यांदा हनी सिंह हा प्रेमात पडलाय. काही वर्षांपूर्वी हनी सिंह हा इंडस्ट्रीपासून दूर होता. यावर अनेक चर्चा देखील रंगल्या होता. यादरम्यानच्या काळात त्याच्या आयुष्यामध्ये नेमके काय सुरू होते हे आता हनी सिंह याने सांगितले आहे. आता धुमधडाक्यात हनी सिंह याने पुनरागमन केले आहे. हनी सिंह याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहात होते.
आतापर्यंत हनी सिंह याने त्याच्या करिअरमध्ये अनेक हीट गाणे म्हटले आहेत. मात्र, हनी सिंह याच्या आयुष्यामध्ये असा एक काळ आला होता की, दिवस रात्र हनी सिंह त्याच्या मरणासाठी प्रार्थना करायचा.
विशेष म्हणजे याबद्दलचा खुलासा एका मुलाखतीमध्ये स्वत: हनी सिंह याने केला आहे. हनी सिंहच्या आयुष्यामध्ये एक अशी वेळ आली होती की, त्याला जगण्याची अजिबात इच्छा राहिली नव्हती आणि तो फक्त देवाकडे मरण मागत होता.
हनी सिंह याने त्याच्या मानसिक आरोग्याबाबत देखील माहिती सांगितलीये. हनी सिंह याने सांगितले की, मानसिक आरोग्यामध्ये अनेक प्रकार आहेत. एक चिंता विकार सामान्य सर्दी सारखाच आहे.
हनी सिंह याने सांगितले की, त्याला मनोविकाराची लक्षणे आणि द्विध्रुवीय विकार होता. हनी म्हणाला, हे खरोखरच खूप जास्त खतरनाक आहे. मला अजिबात वाटत नाही की हे दुसऱ्या कोणाला व्हावे.
या काळामध्ये मी मरणासाठी दररोज प्रार्थना करत होतो. मी पागल झालो होतो आणि मी सतत नशा करत होतो आणि धुम्रपान करायचो. मला झोप कधीच येत नव्हती. परंतू मला हे सर्व कळण्यास खूप उशीर झाला होता.
हनी सिंह याने सांगितले की, हा आजार कळण्यास मला तब्बल तीन वर्ष लागले आणि डाॅक्टर मिळण्यास चार वर्ष लागले होते. हनी पुढे म्हणाला की, आता सर्वकाही व्यवस्थित आहे…मला चांगला डाॅक्टर देखील मिळाला आहे.