मुंबई : सुपरस्टार आणि बाॅलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पठाण या चित्रपटामुळे तूफान चर्चेत आहे. कारण या चित्रपटाने आता पर्यंत अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट (Movie) रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. त्यानंतर शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर गेला. शाहरुख खान हा परत बाॅलिवूडमध्ये पुनरागमन करणार की नाही हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता.
कोरोनानंतर बाॅलिवूडचे चित्रपट सतत फ्लाॅप जात होते. साऊथचे चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना दिसत होते. आता बाॅलिवूडची हवा कमी झाली असून साऊथच्या चित्रपटाकडे प्रेक्षक वळले असल्याचे अनेकांनी म्हटले. कारण या दरम्यान आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्यासारख्या मोठ्या स्टारचे चित्रपट फ्लाॅप गेले.
फक्त आमिर आणि अक्षय यांचेच चित्रपट नाही तर अनेक बिग बजेटचे चित्रपट फ्लाॅप गेल्याने बाॅलिवूडचे मोठे नुकसान झाले. यादरम्यान अनेकांनी शाहरुख खान याचे आता काहीही होऊ शकत नसल्याचे देखील म्हटले होते. मात्र, पठाण चित्रपटाने ओपनिंग डेलाच 100 कोटीची कमाई करत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.
झिरो चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर शाहरुख खान याच्यावर अनेकांनी टिका केली होती. मात्र, तब्बल चार वर्षांनंतर शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांना उत्तरे दिली आहेत. आता यावर रॅपर हनी सिंह याने देखील मोठे भाष्य केले आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
हनी सिंह म्हणाला की, लोक म्हणत होते की शाहरुख खान हा संपला आहे…शाहरुख खान संपला… त्याचा हा देखील चित्रपट चालणार नाही… अगोदरच्या चित्रपटांप्रमाणे…, आता त्याने बँड वाजवला…पुढे हनी सिंह याला विचारण्यात आले की, तू शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बघितला का? यावर हनी सिंह म्हणाला की, आतापर्यंत मी शाहरुख खान याचा चित्रपट बघितला नाहीये.
शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटातील बेशर्म रंग गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. अनेकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, प्रत्यक्षात हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाने धमाका केला. सर्व वादाचा चित्रपटाला फायदा झाल्याचे दिसून आले.