मुंबई : बाॅलिवूड अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आहे. ऋतिक हा सबा आझाद हिला डेट करतोय. इतकेच नाहीतर सबा आणि ऋतिक लग्न करणार असल्याची देखील चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहे. सबा आझाद आणि ऋतिक रोशन यांनी काही दिवसांपूर्वीच जुहू वर्सोवा लिंक रोड येथे एक आलिशान घर खरेदी केले आहे. लग्नानंतर ऋतिक रोशन आणि सबा आझाद (Saba Azad) तिथेच शिफ्ट होणार असल्याच्या देखील चर्चा रंगत आहेत. ऋतिक रोशन याच्या कुटुंबियांसोबतही अनेकदा सबा आझाद ही स्पाॅट झालीये. सतत यांच्या लग्नाच्या (Wedding) चर्चा देखील सुरू आहेत.
न्यू इअर सेलिब्रेशन करण्यासाठी ऋतिक रोशन हा सबा आझाद हिच्यासोबत विदेशातही गेला होता. करण जोहर याच्या पार्टीमध्येही ऋतिक रोशन हा सबा आझाद हिच्यासोबत दिसला. ऋतिक रोशन किंवा सबा आझाद यांनी अजूनही त्यांच्या नात्यावर काही भाष्य केले नाहीये. मात्र, मुंबईमध्येही अनेकदा हे दोघेसोबतच स्पाॅट होतात.
सध्या सोशल मीडियावर एक ट्विट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या ट्विटमध्ये असा दावा करण्यात आलाय की, 2023 मध्ये सबा आझाद आणि ऋतिक रोशन हे लग्न बंधनात अडकणार आहेत. आता या ट्विटवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत. खरोखरच ऋतिक रोशन आणि सबा आझाद 2023 मध्ये लग्न करणार का? यावर चर्चा रंगताना दिसत आहे.
Breaking News:- @iHrithik and #SabaAzad are going to get married in November 2023!
— BollywoodKiNews (@BollywoodKiNews) March 2, 2023
ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या जोडी अनेकांना आवडत नाही. सबा आझाद हिने ऋतिक रोशन याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यावर ती कायमच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येते. काही दिवसांपूर्वी तिने ऋतिक रोशन याच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यावेळी अनेकांनी वडील आणि मुलीची जोडी सुंदर दिसत असल्याचे म्हटले.
ऋतिक रोशन यांच्या अगोदर सबा आझाद ही एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलाला डेट करत होती. ऋतिक रोशन याच्या वाढदिवसाच्या दिवशीही सबा आझाद हिने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. ऋतिक रोशन आणि सबा आझाद नेमके कधी लग्न बंधनात अडकणार याची चाहते वाट पाहताना दिसत आहेत. ऋतिक रोशन हा लवकरच फायटर या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत असणार आहे.