मुंबई : इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिडने द काश्मीर फाइल्स या चित्रपटाबद्दल अत्यंत धक्कादायक विधान केले आहे. आता सर्वत्र नदाव लॅपिडच्या त्या विधानाचा निषेध नोंदवला जातोय. द काश्मीर फाइल्स या चित्रपटाचे डायरेक्टर विवेक अग्निहोत्री यांनी तर थेट नदाव लॅपिडला एक मोठे चॅलेंजच देऊन टाकले आहे. बाॅलिवूडमधील अनेक कलाकारांनी नदाव लॅपिडचा चांगलाच समाचार घेतला असून आपला रोष व्यक्त केलाय. विशेष म्हणजे हे फिल्म फेस्टिव्हल गोव्यामध्ये आहे. विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून संताप व्यक्त केलाय.
नुकताच काश्मीर फाइल्सचे डायरेक्टर विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले आहे की, द काश्मीर फाइल्स चित्रपटातील एकही शॉट चुकीचा आहे, असे पुरावे दिले तर मी आयुष्यामध्ये कधीच चित्रपट तयार करणार नाही, मी चित्रपट बनवणे बंद करेल.
व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, दहशतवादाचे समर्थक आणि नरसंहार नाकारणारे मला कधीही गप्प करू शकत नाहीत… जय हिंद.. काश्मीर फाइल…आता सोशल मीडियावर विवेक अग्निहोत्री यांचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, गोव्यातील IFFI 2022 समारंभात एका ज्युरीने सांगितले की ‘द काश्मीर फाईल्स’ हा एक वल्गर आणि अपप्रचार करणारा चित्रपट आहे. मित्रांनो पण माझ्यासाठी ही नवीन गोष्ट नाही. कारण अशा सर्व गोष्टी दहशतवाद्यांचे समर्थक आहेत आणि भारताला तोडू इच्छित आहेत.
या लोकांना फक्त भारताचे तुकडे तुकडे करायचे आहेत. मला या गोष्टीचे मोठे आर्श्चय वाटले की, भारतामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आणि भारत सरकारने आयोजित केलेल्या मंचावर अशा गोष्टी कशा बोलल्या जाऊ शकतात. मी हा चित्रपट तयार करण्याच्या अगोदर स्वत: 700 लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या, त्यांच्याशी चर्चा केली आहे.
हे 700 लोक दुसरे तिसरे कोणी नसून सर्वांसमोर यांच्या आई, वडील, बहीण, भाऊ यांचे तुकडे करण्यात आले होते. सामूहिक बलात्कार यांच्या आई आणि बहिणींवर झाले होते आणि तुम्ही या चित्रपटाला अपप्रचार बोलता? मी नदाव लॅपिड चॅलेंज करतो की, त्याने फक्त पुरावे द्यावेत, मी यानंतर कधीच चित्रपट तयार करणार नाही…