मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पठाण या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. पठाण चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्यासह दीपिका पादुकोण ही मुख्य भूमिकेत आहे. पठाण (Pathaan) चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट पाहात होते. २०१९ मध्ये शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. झिरो चित्रपटानंतर शाहरुख खान कोणत्याच बाॅलिवूड चित्रपटामध्ये दिसला नव्हता. शाहरुख खान याने आता पठाण चित्रपटाच्या माध्यमातून जोरदार असे पुनरागमन केले आहे. पठाण चित्रपटाने ओपनिंग जबरदस्त करत अनेकांना मोठा धक्का दिला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल ५४ कोटींची कमाई बाॅक्स आॅफिसवर केली. पठाण हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज झाला. मुळात म्हणजे पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा विरोध चित्रपटाला केला जात होता.
पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सतत सोशल मीडियावर केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर एक हवा पठाण चित्रपटाची बघायला मिळाली.
शाहरुख खान याने पठाण चित्रपटाचे खास प्रमोशन केले नाही. मात्र, चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होता. Ask SRK सेशनमधून शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देत होता.
ZindaHaiATBB https://t.co/W2MirOyICW
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 4, 2023
विशेष बाब म्हणजे आता चित्रपट रिलीज झाल्यानंतरही शाहरुख खान हा Ask SRK सेशनमधून चाहत्यांच्या संपर्कात आहे. नुकताच Ask SRK सेशनमधून शाहरुख खान याने आपल्या चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
एका चाहत्याने Ask SRK सेशनमध्ये थेट शाहरुख खान याला त्याच्या बँक खात्याचा पासवर्ड विचारला….चाहत्याच्या या प्रश्नावर शाहरुख खान याने खास उत्तर दिले आहे. यावर शाहरुख खान हा म्हणाला की, “जिंदा है ATBB.”
पठाण चित्रपट रिलीज झाल्यानंतर शाहरुख खान हा Ask SRK सेशन घेणार नसल्याचे अनेकांना वाटले होते. मात्र, आता चित्रपट रिलीज होऊन आठ दिवस झालेले असताना देखील शाहरुख खान सेशन घेत आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देत आहे.