कोलकातामधील (Kolkata) नजरुल मंच इथं मंगळवारी रात्री लाईव्ह शोदरम्यान प्रसिद्ध बॉलिवूड गायक केके (Singer KK) यांचं निधन झालं. कोलकाता पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. केके यांच्या निधनानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. केके यांच्या डोकं, चेहरा आणि ओठांवर जखमा आढळून आल्या असून, थोड्याच वेळात त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचं कळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केके यांनी हॉटेलवर पोहोचल्यानंतर उल्टीसुद्धा केली होती. पोलीस हॉटेलच्या शिफ्ट मॅनेजरचीही (Hotel Manager) चौकशी करत आहेत. केके यांचं निधन कार्डिअॅक अरेस्टने की दुसऱ्या कारणाने झालं, याचा तपास पोलीस करत आहेत. केके यांची पत्नी आणि मुलगा आज (बुधवार) सकाळी कोलकात्याला पोहोचले आहेत. कुटुंबीयांची संमती मिळाल्यानंतर चौकशी आणि शवविच्छेदन केले जाईल. कोलकाता इथल्या एसएसकेएम रुग्णालयात पोस्टमॉर्टमची व्यवस्था करण्यात येत आहे. मंगळवारी कोलकातामधल्या नजरूल मंच याठिकाणी केके यांचा लाईव्ह शो होता आणि याच शोदरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं.
न्यू मार्केट ठाण्याच्या पोलिसांनी हॉटेलच्या शिफ्ट मॅनेजरची याप्रकरणी चौकशी केली आहे. केके हॉटेलमध्ये कधी आले, त्यांच्यासोबत कोण होतं, हॉटेलमधील रुममध्ये त्यांच्यासोबत कोण आलं याबाबतची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी चौकशी केली. केके यांनी हॉटेलमध्ये काय खाल्लं होतं, याचीही चौकशी पोलिसांनी केली.
The very moment when #KK felt uneasy and was taken to CMRI hospital, #Kolkata. He was declared brought dead.
He performed the show and ended it.#RIP #KK Not KK pic.twitter.com/WFOHKdCqFn
— Madhuri Rao (@madhuriadnal) June 1, 2022
#EXCLUSIVE
The very moment when playback singer KK was being taken back to hotel after he complained about his health condition. He has been declared brought dead by the doctors of CMRI. #KK #NewsToday #KKsinger #KKDies #kkdeath #SingerKK@ANI @MirrorNow @TimesNow @htTweets pic.twitter.com/zX5A2ZPvTW— Tirthankar Das (@tirthaMirrorNow) May 31, 2022
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करत आहेत. अखेरच्या क्षणी केके कोणासोबत होते आणि नेमकं काय झालं, याचा तपास पोलीस करत आहेत. केके यांना लाईव्ह शोदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना आधी हॉटेलमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.