मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा पठाण (Pathaan) हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहे. चित्रपटाने रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी नक्कीच केलीये. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. २०१९ मध्ये रिलीज झालेला शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा झिरो या चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला होता. या चित्रपटानंतर शाहरुख खान कोणत्याच बाॅलिवूड चित्रपटांमध्ये दिसला नाही. इतकेच नाहीतर यादरम्यान शाहरुख खान याने थेट बाॅलिवूडला कायमची सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला होता. शाहरुख खान याच्या पुनरागमनाची वाट त्याचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून पाहत होते. शेवटी तब्बल चार वर्षांनंतर शाहरुख खान याचा पठाण चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आला. शाहरुख खान याचा हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. पठाण चित्रपटाने ओपनिंग डेलाच मोठा धमाका करत अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले. पठाण चित्रपटाने ओपनिंग डेला जगभरातून तब्बल १०० कोटींचे कलेक्शन केले. भारतामधून पहिल्याच दिवशी ५४ कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन झाले.
पठाण या चित्रपटाला रिलीज होऊन आता आठ दिवस झाले आहेत. चित्रपट रिलीज होऊन आठ दिवस झाले असताना देखील बाॅक्स आॅफिसवर पठाण चित्रपटाची हवा बघायला मिळत आहे. विकेंडला तर चित्रपटाने तूफान अशी कामगिरी बाॅक्स आॅफिसवर केलीये.
पठाण या चित्रपटाला फक्त भारतामध्येच नाही तर जगभरात प्रेम मिळत आहे. या आठवड्यात पठाण हा चित्रपट १००० कोटींचे बाॅक्स बाॅक्स कलेक्शन करू शकले असे अनेकांचे म्हणणे आहे.
पठाण चित्रपटाची जरी सुसाट अशी कामगिरी बाॅक्स आॅफिसवर सुरू असली तरीही दंगल आणि KGF2 यासारख्या चित्रपटांचे रेकाॅर्ड तोडणे पठाण चित्रपटासाठी थोडे अवघड आहे. कारण हे चित्रपट पठाण चित्रपटापेक्षा कमाईमध्ये पुढे आहेत.
जगभरातून सर्वाधिक कमाई करणारा बाॅलिवूड चित्रपट आमिर खान याचा दंगल हा आहे. या चित्रपटाने जगभरातून २०७० कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले आहे. त्यानंतर प्रभासचा चित्रपट बाहुबली २ आहे.
बाहुबली २ या चित्रपटाने १७८८.०६ कोटींचे कलेक्शन केले आहे. केजीएफ २ या चित्रपटाने १२०८ कोटींची कमाई केलीये. आरआरआर चित्रपटाने RRR ११५५ कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले.
पठाण हा चित्रपट १००० कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन करू शकले असे ट्रेड तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, दंगल, बाहुबली २ आरआरआर यासारख्या चित्रपटांचे रेकाॅर्ड तोडणे पठाण चित्रपटासाठी थोडे अवघड ठरणार आहे.