मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अक्षय याने हेरा फेरी 3 हा चित्रपट करण्यास नकार दिला. यानंतर अनेकांनाच मोठा धक्का बसला. चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून परत एकदा हेरा फेरी चित्रपटामध्ये अक्षयची धमाल पाहण्यास इच्छुक आहेत. चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली नसल्याने चित्रपटाला नकार दिल्याचे अक्षय कुमार याच्याकडून सांगण्यात आले. परंतू एक चर्चा आहे की, हेरा फेरी 3 साठी अक्षयला हवी ती फी मिळत नसल्याने त्याने चित्रपटाला नकार दिला.
अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 ला नकार दिल्याने लगेचच फिरोज नाडियाडवाला याने अक्षयच्या जागी पर्याय शोधला असून कार्तिक आर्यन हा अक्षय कुमार ऐवजी चित्रपटामध्ये दिसणार असल्याचे जवळपास फायनल आहे.
रिपोर्टनुसार चित्रपटाच्या दोन स्क्रीप्ट तयार करण्यात आल्या आहेत. एक अक्षय कुमार प्रमाणे आणि दुसरी कार्तिक आर्यनसाठी. अजूनही चित्रपट हेरा फेरीच्या निर्मात्यांना अपेक्षा आहेत की, अक्षय कुमार हा चित्रपटासाठी होकार देईल.
फिरोज नाडियाडवाला हे अक्षय कुमार याच्या संपर्कात असून चर्चा सुरू आहे. दुसरी टीम कार्तिक आर्यनच्या संपर्कात आहे. म्हणजे असूनही हे फायनल होऊ शकले नाहीये की, हेरा फेरी 3 मध्ये नेमका कोणता हिरो मुख्य भूमिकेत आहे.
सोशल मीडियावर जेंव्हापासून हे कळाले की अक्षय कुमार हा हेरा फेरी 3 मध्ये दिसणार नाही. तेंव्हापासून फिरोज नाडियाडवाला यांच्यावरील दबाव वाढला आहे. चाहते अक्षय कुमारलाच हेरा फेरी 3 मध्ये पाहू इच्छित आहेत.