जॅकलीन फर्नांडिस हिच्या घायाळ करणाऱ्या अदा, अभिनेत्रीच्या फोटोमुळे वाढला इंटरनेटचा पारा, अत्यंत बोल्ड लूक…

| Updated on: Apr 29, 2023 | 10:03 PM

बाॅलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलीन फर्नांडिस हिचे नाव आल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला होता. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलीन फर्नांडिस हिची अनेकदा चाैकशी करण्यात आली.

जॅकलीन फर्नांडिस हिच्या घायाळ करणाऱ्या अदा, अभिनेत्रीच्या फोटोमुळे वाढला इंटरनेटचा पारा, अत्यंत बोल्ड लूक...
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. जॅकलीन फर्नांडिस हिचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. इतकेच नाही तर सुकेश चंद्रशेखर याच्या प्रेमात जॅकलीन फर्नांडिस इतकी जास्त आंधळी झाली होती की, तिला सुकेश याच्यासोबत लग्न करायचे होते. सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) हा सध्या दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आहे. मात्र, जेलमध्ये असताना देखील सुकेश चंद्रशेखर हा सतत जॅकलीन फर्नांडिस हिला प्रेम पत्र पाठवताना दिसतो. इतकेच नाही तर जेलमधून सुनावनीसाठी बाहेर पडत असताना तो अनेकदा जॅकलीन फर्नांडिस हिला लव्ह यू बोलताना देखील दिसतो.

फक्त जॅकलीन फर्नांडिस हिच नाही तर बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्री या सुकेश चंद्रशेखरच्या संपर्कात होत्या. बाॅलिवूडच्या अभिनेत्रींना सुकेश हा कायमच अत्यंत महागडे गिफ्ट देत असत. नोरा फतेही हिचे नाव देखील सुकेश चंद्रशेखर याच्या प्रकरणात आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. या प्रकरणात जॅकलीन फर्नांडिस हिच्यासोबत नोरा फतेही हिचे पाय देखील खोलात आहेत.

सुकेश चंद्रशेअर याने नोरा फतेही हिला देखील अत्यंत महागडे गिफ्ट दिले आहेत. काही दिवसांपूर्वी एक चर्चा होती की, सुकेश चंद्रशेखर याच्या जीवनावर आधारित एक चित्रपट तयार करण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे बाॅलिवूडमधील अत्यंत प्रसिध्द चित्रपट निर्माते या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटामध्ये जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्या भूमिका कोण साकारणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

नुकताच जॅकलीन फर्नांडिस हिने सोशल मीडियावर अत्यंत बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ट्राइबल लूकमधील फोटो जॅकलीन फर्नांडिस हिने शेअर केले. या लूकमध्ये जॅकलीन फर्नांडिस ही जबरदस्त बोल्ड दिसत आहे. चाहत्यांना जॅकलीन फर्नांडिस हिचे हे फोटो प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. एकाने कमेंट करत फायर है म्हटले आहे. जॅकलीन फर्नांडिस हिच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वीच जॅकलीन फर्नांडिस हिचा सर्कस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाची निर्मिती ही रोहित शेट्टी याने केली. या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस हिच्यासोबत रणवीर सिंह हा मुख्य भूमिकेत होता. सर्कस हा चित्रपट काॅमेडी चित्रपट आहे. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. जॅकलीन फर्नांडिस आणि रणवीर सिंह यांची जोडी प्रेक्षकांनी फार काही आवडली नाही.