Jacqueline Fernandez | बोल्ड फोटोशूट, जॅकलिन फर्नांडिस आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर, थेट म्हणाले, सुकेश चंद्रशेखर याची

| Updated on: Apr 15, 2023 | 6:58 PM

बाॅलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आहे. जॅकलिन फर्नांडिस हिचा सेल्फी हा चित्रपट देखील काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटामध्ये जॅकलिन फर्नांडिस ही अक्षय कुमार याच्यासोबत मुख्य भूमिकेत होती.

Jacqueline Fernandez | बोल्ड फोटोशूट, जॅकलिन फर्नांडिस आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर, थेट म्हणाले, सुकेश चंद्रशेखर याची
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिचे नाव 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आल्याने चाहत्यांना धक्का बसला. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस याचे नाव जोडले गेल्याने तिचे चाहते हैराण झाले. या मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money laundering case) आतापर्यंत बऱ्याच वेळा जॅकलिन फर्नांडिस हिची चाैकशी देखील करण्यात आली. इतकेच नाही तर जॅकलिन फर्नांडिस हिला विदेशात जाण्याची परवानगी देखील नाहीये. जॅकलिन फर्नांडिस हिला चक्क सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याच्यासोबत लग्न करायचे होते.

जॅकलिन फर्नांडिस हिने काही दिवसांपूर्वी सांगितले की, सुकेश चंद्रशेखर हा कोणत्या मार्गाने पैसा कमावतो, याची मला अजिबात कल्पना नव्हती. सुकेश चंद्रशेखर याच्या पैशांशी माझा काहीच संबंध नाही. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाबद्दलही मला काहीही माहिती नाही, असे यापूर्वी जॅकलिन फर्नांडिस हिने सांगितले. फक्त जॅकलिन फर्नांडिस हिच नाही तर सुकेश चंद्रशेखर हा बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्रींच्या संपर्कात होता.

जॅकलिन फर्नांडिस हिच्यासह नोरा फतेही हिला देखील सुकेश चंद्रशेखर याने अत्यंत महागडे गिफ्ट दिले. सोशल मीडियावरही जॅकलिन फर्नांडिस हिचे सुकेश चंद्रशेखर याच्यासोबतचे अनेक फोटो बघायला मिळतात. सध्या सुकेश चंद्रशेखर हा दिल्लीतील तिहार जेलमध्ये आहे. मात्र, असे असतानाही सुकेश चंद्रशेखर हा कायमच जॅकलिन फर्नांडिस हिला प्रेम पत्र लिहितो. जॅकलिन फर्नांडिस हिने नुकताच खास फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये जॅकलिन फर्नांडिस ही अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.

जॅकलिन फर्नांडिस हिने लॅव्हेंडर क्रॉप टॉप स्लिट ड्रेसमध्ये हे फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये जॅकलिन फर्नांडिस ही अत्यंत बोल्ड दिसत आहे. आता जॅकलिन फर्नांडिस हिचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी हा फोटोवर कमेंट करत जॅकलिन फर्नांडिस हिला सुकेश चंद्रशेखर याची आठवण करून दिलीये.

एका युजर्सने जॅकलिन फर्नांडिस हिला ट्रोल करत म्हटले की, ही सुकेशची बिल्ली आहे, दुसऱ्याने लिहिले की, सुकेश चंद्रशेखर हा तिहार जेलमधून प्रेमाने लिहित आहे की, मी तुला मिस करत आहे माझी शुगर बेबी, तिसऱ्याने लिहिले की, जॅकलिन फर्नांडिस हिचा दिल आहे पर्पल पर्पल आहे. अजून एकाने लिहिले की, लव फ्रॉम गली 420. आता जॅकलिन फर्नांडिस हिचे हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.