मुंबई : 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसचे नाव आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. ED कडून अनेकदा जॅकलीनला चाैकशीसाठी बोलवण्यात आले आहे. आज जॅकलीन फर्नांडिसच्या नियमित जामीन अर्जावर दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे या सुनावणीला जॅकलीन फर्नांडिसला देखील उपस्थित राहणार आहे. सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनला खूप महागडे गिफ्ट दिले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे फक्त जॅकलीन फर्नांडिसच नाही तर बाॅलिवूडच्या इतरही काही अभिनेत्री या सुकेश चंद्रशेखरच्या संपर्कात होत्या.
200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर सध्या दिल्लीतील तुरुंगात आहे. सुकेश तुरुंगात असताना देखील बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी त्याची भेट घेतल्याची माहिती काही दिवसांपूर्वी उघड झाली होती. सुकेशने अनेक बाॅलिवूड अभिनेत्रींना महागडे गिफ्ट दिले आहेत. यामध्ये नोरा फतेहीचे देखील नाव आहे. काही दिवसांपूर्वी नोरा फतेहीला देखील चाैकशीसाठी बोलावण्यात आले होते.
17 ऑगस्ट रोजी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये 200 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात जॅकलीनलही आरोपी असल्याचे आढळून आले. जॅकलिनला मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी बनवल्यानंतर तिच्या वकिलाने लगेचच जामीन अर्ज दाखल केला. जॅकलिनचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात आल्यानंतर बाॅलिवूडमधील अनेक कलाकरांनी जॅकलिनपासून चार हात दूर राहणेच पसंत केले. काही स्टारने सुकेश चंद्रशेखरपासून लांब राहण्याचा सल्ला फार पूर्वी जॅकलिनला दिला होता.