मुंबई : जान्हवी कपूर सध्या व्यस्त आहे. ऐका मागून एक चित्रपट जान्हवीचे रिलीज होत आहेत. नुकताच जान्हवी कपूरचा मिली हा चित्रपट रिलीज झालाय. मिली चित्रपटाचे निर्माते जान्हवीचे वडील स्वत: बोनी कपूर आहेत. मात्र, जान्हवी कपूरच्या मिलीची जेवढी चर्चा अगोदर होती, त्या तुलनेत हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काहीच धमाका करू शकलेला नाहीये. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. आता जान्हवी तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. जान्हवीच्या या नव्या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करतोय.
जान्हवी कपूर गेल्या काही दिवसांपासून हीट चित्रपट देण्यासाठी सतत प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, जान्हवीचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. मिली चित्रपटात लोकांना जान्हवीचा अभिनय अजिबात आवडला नसल्याचे सांगितले जातंय. मिली चित्रपटाचे बजेट देखील बाॅक्स आॅफिसवरील कलेक्शनवरून निघाले नाहीये. यामुळे आता जान्हवी पुढच्या चित्रपटात काय धमाल करते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
जान्हवी कपूरचा मिस्टर अँड मिसेस माही हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामुळे जान्हवी सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात जान्हवी एका क्रिकेटरची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात ती राजकुमार रावसोबत दिसणार आहे. नुकताच जान्हवीने एका मुलाखतीमध्ये मिस्टर अँड मिसेस माही चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिला दुखापत झाल्याचे सांगितले. शूटिंग दरम्यान एक सीन करताना जान्हवीच्या खाद्याला गंभीर दुखापत झाली होती. यावेळी जान्हवी म्हणाली की, खरोखरच क्रिकेट खेळणे अजिबात सोप्पे काम नाहीये.