मुंबई : सध्या मनोरंजन विश्वातून अशी अनेक नावे समोर आली आहेत, ज्यांना कोरोनाच्या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. कामाअभावी अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे, तर अनेकांना काही गंभीर आजाराशी झुंज द्यावी लागत आहे. या पूर्वी बाबा खान, शगुफ्ता अली आणि सविता बजाज अशी अनेक नावे समोर आली होती. दरम्यान, ‘जोधा अकबर’ आणि ‘ये है मोहब्बतें’ या टीव्ही मालिकांमध्ये काम केलेले अभिनेता लोकेंद्र सिंह राजावत (Lokendra Singh Rajawat) यांना मधुमेहामुळे एक पाय कापावा लागला आहे.
कोरोना काळात त्यांना कामाच्या समस्यांचा सामना करावा लागत होता. तणावामुळे त्याच्या मधुमेहाची पातळी देखील वाढतच राहिली आणि आता त्यांना हा वाईट दिवस पाहावा लागला आहे. ही बातमी त्या सर्वांसाठी डोळे उघडणारी आहे, हे त्यांच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत.
मीडिया रिपोर्टनुसार, पाच तास चाललेल्या ऑपरेशननंतर डॉक्टरांनी त्यांचा एक पाय शरीरापासून वेगळा केला आहे. एका मुलाखतीत, लोकेंद्र यांनी सांगितले की, उच्च तणाव पातळीमुळे, त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले, ज्यामुळे त्यांचा एक पाय कापावा लागला.
संभाषणादरम्यान लोकेंद्र म्हणाला, ‘मी आता काहीही करू शकत नाही. कोरोना महामारीच्या आधी, मी चांगले काम करत होतो. पण, जेव्हा काम कमी होऊ लागले तेव्हा आर्थिक समस्यांमुळे चिंता वाढू लागली.’ लोकेंद्र पुढे म्हणाले की, ‘सुरुवातीला त्यांच्या उजव्या पायात समस्या होत्या. जेव्हा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा हा संसर्ग पसरत राहिला. त्यांना गॅंग्रीन झाले होते. यात स्वतःला वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गुडघ्यापर्यंत पाय कापणे हा होता.’
लोकेंद्र यांचे ऑपरेशन मुंबईतील भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये पाच तास चालले. लोकेंद्र पुढे म्हणतात की, ’10 वर्षांपूर्वी मला मधुमेह झाला होता, तेव्हा मी त्याकडे लक्ष दिले असते तर बरं झालं असतं, अशी माझी इच्छा आहे. आम्हा कलाकारांना शूट करण्यामधून वेळ मिळत नाही. खाण्यातील अनियमितता आणि कामाचे तास आणि तणावही यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो.’
लोकेंद्र यांनी असेही सांगितले की, CINTAA द्वारे त्यांना आर्थिक मदत देखील प्रदान केली गेली आहे. याशिवाय, सर्व कलाकार मला फोन करून विचारपूस करत आहेत, माझी काळजी घेत आहेत आणि मला प्रोत्साहित करत आहेत.
लोकेंद्र यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ते ‘ये है मोहब्बतें’ आणि ‘जोधा अकबर’ व्यतिरिक्त ‘सीआयडी’, ‘क्राईम पेट्रोल’ आणि रणबीर कपूरच्या ‘जग्गा जासूस’ मध्येही दिसले आहेत. याशिवाय लोकेंद्र मीजान जाफरीच्या ‘मलाल’ या चित्रपटातही झळकले होते.
‘बेल बॉटम’च्या ट्रेलर लाँचसाठी अक्षय कुमार सज्ज, दिल्लीत होणार रिलीज सोहळा!
करिअरला उरती कळा लागल्यावर पत्नीने घर सावरलं, मनीष पॉलने दमदार पदार्पण करत पुन्हा यश मिळवलं!