मुंबई : पठाण या चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्यासह दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम (John Abraham) हे मुख्य भूमिकेत आहेत. मात्र, पठाण या चित्रपटाचा जेंव्हा विषय निघतो, त्यावेळी शाहरुख खान याच्याच नावाची चर्चा होते. पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा वाद झाला आणि अजूनही सुरूच आहे. बेशर्म रंग या गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हीने भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे वाद झाला. पंरतू सोशल मीडियावर दीपिका पादुकोण हिच्यापेक्षा जास्त शाहरुख खान यालाच लोकांनी ट्रोल केले. बेशर्म रंग गाणे रिलीज झाल्यापासूनच पठाण हा चित्रपट जास्त चर्चेत आलाय. इतकेच नाही तर इतका जास्त वाद होऊनही बेशर्म रंग हे गाणे हीट झाले.
पठाण चित्रपटामध्ये जॉन अब्राहम हा देखील महत्वाच्या भूमिकेत असून त्याच्या नावाची चर्चा फार काही होताना दिसत नाहीये. दोन दिवसांपूर्वीच चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाला. जॉन अब्राहम याने त्याच्या सोशल मीडियावर हा ट्रेलर शेअर केला होता.
शाहरुख खान सध्या पठाण चित्रपटाचे प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज होतोय. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान हा तब्बल चार वर्षांनी पुनरागमन करतोय. पठाणनंतर शाहरुख खान याचा लगेचच डंकी हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
This is how John destroyed his own film #Pathaan! I called and asked him about it, and he is very very upset after watching Final Cut of the film. Director narrated him a different story before starting shoot. pic.twitter.com/7TF1e6H3Tt
— KRK (@kamaalrkhan) January 12, 2023
नुकताच सोशल मीडियावर केआरके याने जॉन अब्राहम याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जॉन अब्राहम याला पठाण चित्रपटाबद्दल काही प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, पठाणवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर उत्तर देणे जॉन अब्राहम टाळत असल्याचे दिसत आहे.
जॉन अब्राहम याचा हा व्हिडीओ पाहून अनेक चर्चांना सध्या उधाण आले असून जॉन अब्राहम नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, खरोखरच जॉन अब्राहम नाराज आहे का? हे सांगणे कठीण आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिवयावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.