Happy Birthday Nysa | 20 वर्षांची झालीये अजय देवगण आणि काजोल यांची लेक, खास फोटो शेअर करत नीसा आणि…

| Updated on: Apr 20, 2023 | 6:51 PM

अजय देवगण याची लेक नीसा देवगण ही कायमच चर्चेत असते. आज अजय देवगण आणि काजोल यांची लेक नीसा देवगण हिचा आज वाढदिवस आहे. अनेकांनी नीसा हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लेकीच्या वाढदिवसानिमित्त अजय देवगण याने खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये.

Happy Birthday Nysa | 20 वर्षांची झालीये अजय देवगण आणि काजोल यांची लेक, खास फोटो शेअर करत नीसा आणि...
Follow us on

मुंबई : अजय देवगण आणि काजोल यांची लेक नीसा देवगण (Nysa Devgn) ही कायमच चर्चेत असते. नीसा हिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले जाते. काही दिवसांपूर्वी एका पार्टीमधून बाहेर पडतानाचा नीसा देवगण हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये (Video) नीसा देवगण हिला व्यवस्थित चालता येत नसल्याने नेटकऱ्यांनी तिला खडेबोल सुनवत थेट दारू कमी पिण्याचा सल्ला देऊन टाकला होता. सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर असलेली नीसा देवगण ही आता 20 वर्षांची झालीये. आज नीसा देवगण हिचा वाढदिवस आहे. सोशल मीडियावर (Social media) चाहते मोठ्या प्रमाणात नीसा देवगण हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

लेकीच्या वाढदिवसाच्या दिवशी बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केलीये. या फोटोमध्ये नीसा देवगण आणि अजय देवगण हे दिसत आहेत. या फोटोमध्ये नीसा आणि अजय यांच्यामधील क्यूट बॉन्डिंग दिसत आहे. हे फोटो शेअर करताना अजय देवगण याने लिहिले की, हॅपी बर्थडे बेबी. आता अजय देवगण याची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

अजय देवगण याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत नीसा देवगण हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री काजोल हिने देखील लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये काजोल हिने एका फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये काजोल आणि नीसा देवगण यांचा लूक जबरदस्त दिसत आहे.

ही पोस्ट शेअर करताना काजोल हिने कॅप्शन शेअर करत लिहिले की, हे आम्ही आहोत आणि नेहमीच आम्ही असे राहू… मला तुझे सेंस ऑफ ह्यूमर, डोके आणि तुझे सुंदर हृदय आवडते. मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करते आणि मी आशा करते की तू असेच माझ्यासोबत नेहमी हसत राहशील. आता काजोल हिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

काही दिवसांरपूर्वी आपल्या मित्रांसोबत पार्टीमधून बाहेर पडताना नीसा देवगण ही दिसली होती. यावेळी पापाराझी हे नीसा हिला फोटोसाठी थांबवण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी तिला न्यासा न्यासा असे आवाज देण्यात आले. यावेळी नीसा ही गाडीमध्ये बसते आणि पापाराझी यांनी सांगते की, माझे नाव नीसा आहे, न्यासा नाही. यानंतर तिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.