मुंबई : कमाल रशीद खान उर्फ केआरकेने बाॅलिवूड (Bollywood) चित्रपटांना पुन्हा एकदा टार्गेट करण्यास सुरूवात केलीयं. केआरके स्वतः चित्रपट समीक्षक म्हणून ओळखले जातात. विशेषतः त्यांना बॉलिवूड चित्रपट आवडत नाहीत. दिग्दर्शक (Director) मोहित सूरीचा चित्रपट ‘एक व्हिलन रिटर्न्स’ पाहिल्यानंतर केआरकेने रिव्ह्यू दिला आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट मोठा फ्लॉप (Flop) असल्याचे त्याने सांगितले आहे. केआरकेने आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच ‘लाशें बिछाने आ जाएगी’ असे म्हटले आहे. यामुळे आता हा वाद वाढण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी शमशेरावर केआरके टिका केली होती.
Bollywood is rocking big time. #Dhakad Gayee Toh #OM Aayee. #OM Gayee Toh #JJJ Aayee. Woh Gayee Toh #Prithviraj Aa Gayee. Woh Gayee Tho #Shamshera Chaa Gayee. Woh Gayee Toh #EkVillainReturns ki Aafat, fir #LSC ka Mahakal. LSC Jaise Hi Utregi #Brahmastra Laashe Bichane Aa Jaayegi.
हे सुद्धा वाचा— KRK (@kamaalrkhan) July 29, 2022
केआरकेने एक ट्विट केले आहे, ज्याची चर्चा आता सर्वत्र रंगताना दिसते आहे. ट्विट केआरकेने सतत फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांची नावे घेत बॉलीवूडची खिल्ली उडवली आहे. कंगना राणौतचा ‘धाकड’, अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’, रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ आणि आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटांचा उल्लेख करत त्याने टोमणे मारले आहेत. केआरकेने ट्विटमध्ये म्हटले आहे की, यावेळी बॉलिवूड धमाल करत आहे. यामध्ये त्याने पृथ्वीराज, धाकड, लाल सिंग चड्ढा, शमशेरा चित्रपटांचा देखील उल्लेख केला आहे.
केआरकेच्या ट्विटवर अनेक युजर्सने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटले आहे की, तुम्ही त्यात रक्षाबंधनाचे नाव लिहायला विसरलात, तीही धूळ चाटणार आहे. आणखी एका युजरने लिहिले की, ‘प्रेत ठेवायला येणार. आमिर बाबाला निकाल आधीच समजला आहे, त्यामुळे रिलीजपूर्वी 160 कोटींमध्ये OTT पेस्ट करण्यात आला. आमिर खानचे अनेक चाहते त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाला पसंती देत आहेत. काही युजर्सचे म्हणणे आहे की केआरकेची यादी बरोबर आहे पण आमिरचा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरेल.
कमाल रशीद खानच्या मनात बॉलिवूड चित्रपटांविषयी द्वेष आहे. केआरके प्रत्येक नवीन बॉलिवूड चित्रपट पाहतो आणि ट्विटरवर त्याच्यावर टीका देखील करतो. काही दिवसांपूर्वीच केआरकेने शमशेरा या रणबीर कपूरच्या चित्रपटावर निशाना साधला होता. त्याने एक ट्विट करत म्हटले होते की, बाॅलिवूडची चित्रपटे ही कोरोनापेक्षाही अधिक खतरनाक आहेत. तसेच त्यांने चित्रपटाच्या दिग्दर्शकांवरही जहरी टिका केली होती आणि म्हटले होते की, यांचे चित्रपट चांगले नाहीत हे कधीच बाॅलिवूडवाले मान्य करत नाहीत.