मुंबई : अभिनेता KRK अर्थात कमाल रशीद खान (Kamal R Khan) यांना मोठा दिलासा मिळायं. आक्षेपार्ह ट्विटमुळे KRK ला तुरुंगात जावे लागले. केआरकेवर आरोप आहे की, बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्या मृत्यूनंतर आक्षेपार्ह ट्विट केले. आता KRK ला न्यायालयाने (Court) जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिलायं. कमाल रशीद खान कायम आक्षेपार्ह ट्विट (Tweet) करून मोठा वाद निर्माण करतात. KRK च्या टार्गेटवर कायम बाॅलिवूडचे कलाकार असतात. मात्र, 2020 मध्ये केलेले एक ट्विट KRK ला चांगलेच भोवल्याचे दिसते आहे.
न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर कमाल आर खान यांची आज दुपारी 12 वाजता ठाणे कारागृहातून सुटका होणार आहे. कमाल खानला मालाड पोलिसांनी वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी अटक केली होती. मुंबई विमानतळावरून पोलिसांनी KRK ला अटक करत न्यायालयात नेले होते. काल बोरिवली कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान कमाल खानला जामीन मिळालायं. आता सुटकेनंतर कमाल आर खान नेमके काय ट्विट करतात, हे बघण्यासारखे ठरले.
दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्या मृत्यूवर भाष्य केल्याबद्दल KRK न्यायालयीन कोठडीत असताना एका अभिनेत्रीने विनयभंगाचा गुन्हाही दाखल केला होता. 27 वर्षीय पीडितेने पोलिस तक्रार दाखल केली होती की ती 2017 मध्ये मुंबईत आली होती, जिथे तिची केआरकेसोबत एका घरगुती पार्टीत भेट झाली आणि त्यानंतर या अभिनेत्रीचा KRK ने विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.