मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत कायमच चर्चेत राहते. कंगना सोशल मीडियावरही सक्रिय कायम असते. विषय कोणताही असो कंगना आपले मत मांडल्याशिवाय राहत नाही. कंगना राणावत हिचे नुकताच ट्विटरवर कम बॅक झाले आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी कंगना राणावत हिचे ट्विटर सस्पेंड करण्यात आले होते. मात्र, असे असताना देखील कंगना राणावत ही इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात होती. २०२१ मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या वेळी कंगना राणावत हिचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. कंगना राणावत हिने काही वादग्रस्त ट्विट केल्याने अकाउंट सस्पेंड करण्यात आले. अनेकदा कंगना राणावत हिच्या निशाण्यावर बाॅलिवूडमधील अनेक कलाकार असतात. कंगना नेहमीच बाॅलिवूडच्या कलाकारांवर टीका करताना दिसते.
शाहरुख खान याचा पठाण चित्रपट बाॅक्स आॅफिसवर सुसाट अशी कामगिरी करत आहे. सर्वत्र शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाचे काैतुक होत आहे. शिवाय पठाण चित्रपटातील शाहरुख खान याची जबरदस्त भूमिका पाहून अनेकांनी शाहरुख खान याची तारीफ केलीये.
पठाण चित्रपटाचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन पाहून लोकांना खानच आवडतात म्हणत कंगना राणावत हिने शाहरुख खान याला टार्गेट करत एक पोस्ट रिशेअर केली होती. यामध्ये एक महिला ही पठाण चित्रपटासाठी शाहरुख खान याचे काैतुक करत होती.
कंगना राणावत ही तिच्या इंस्टा स्टोरीमुळे पुन्हा चर्चेत आलीये. यावेळी कंगना हिने नाव न घेताना अनेक गंभीर आरोप केले आहेत. जरी या पोस्टमध्ये तिने कोणाचे नाव घेतले नसेल. मात्र, तिच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होत आहे की, तिचा निशाना नेमका कोणावर आहे.
कंगना राणावत हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मी जिथे जाते तिथे माझा पाठलाग केला जातोय…मला फक्त रस्त्यावरच नाही तर प्रत्येक ठिकाणी पकडण्यासाठी झूम लेन्सचा वापर केला जातोय. मला स्पाॅट करण्यासाठी कोणत्याही पैपराजीला मी किंवा माझ्या टीमने पैसे दिले नाहीयेत.
या लोकांना माझे सर्व शेड्यूल कसे कळते हेच मुळात मला समजत नाही. इतकेच नाही तर माझा व्हॉट्सअॅप डेटा लीक होत आहे असा देखील गंभीर आरोप कंगना राणावत हिने केला आहे.
या पोस्टमध्ये कंगना राणावत हिने कोणाचेही नाव घेतले नाहीये. मात्र, कंगनाच्या बोलण्यावरून एक अंदाजा लागतोय की, कंगना राणावत हिचा निशाणा नेमका कोणावर आहे. कंगनाच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तीचे अनेक महिलांशी संबंध आहेत. यासोबतच कंगनाने त्याला नॅपो माफिया ब्रिगेडचा उपाध्यक्षही म्हटले आहे.
कंगना राणावत हिने लिहिले की, त्या व्यक्तीने आपल्या पत्नीला चित्रपट निर्माता होण्यासाठी आणि महिला केंद्रित चित्रपट तयार करण्यास फोर्स केलाय. शेवटी कंगना राणावत हिने लिहिले की, तुला आणि तुझ्या नवजात प्रिय मुलीवर खूप प्रेम…यावरून एक अंदाजा लावला जातोय की, कंगना राणावत हिने ही पोस्ट आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना टार्गेट करत लिहिलेय.