मुंबई : बॉलिवूडची ‘क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या ‘थलायवी’ (Thalaivii) चित्रपटासाठी बरीच चर्चेत आहे. कंगनाला या चित्रपटात जयललिता यांचे पात्र साकारल्याबद्दल कौतुकाची थाप मिळत आहे. दरम्यान, कंगनाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. जयललितांच्या भूमिकेनंतर आता कंगना लवकरच ‘माता सीता’ची भूमिका साकारताना दिसणार आहे.
कंगनाने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली माहिती
कंगना रनौतनं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. या पोस्टद्वारे कंगनानं सांगितलं आहे की, ती आलोक देसाई दिग्दर्शित ‘सीता’ चित्रपटात मुख्य पात्र साकारणार आहे. कंगनाने तिच्या पोस्टमध्ये असंही सांगितलं की, ती या पात्राबद्दल खूप उत्साहित आहे.
कंगना रनौतची इन्स्टाग्राम पोस्ट
कंगनाने पोस्टमध्ये लिहिले, ‘द अवतार – सीता, सीता राम यांच्या आशीर्वादाने या प्रतिभावान कलाकारांच्या टीमसोबत या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. जय सिया राम’.
चित्रपट अनेक महिन्यांपासून चर्चेत
आलोक देसाई यांचा हा चित्रपट अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरला होता. या चित्रपटासाठी अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली. याआधी अशी बातमी आली होती की करीना कपूर खान या चित्रपटात सीतेची भूमिका साकारणार आहे. पण करीनानं या चित्रपटासाठी 12 कोटी रुपये फीची मागणी केली. त्यानंतर आता हे पात्र करीनाच्या हातून निसटलं आणि कंगना रनौतच्या हाती लागले आहे. या बातमीमुळे कंगना रनौतच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
‘द अवतार- सीता’ हा चित्रपट एक पौराणिक ड्रामा चित्रपट
‘द अवतार- सीता’ हा चित्रपट एक पौराणिक ड्रामा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आलोक देसाई करणार आहेत. या चित्रपटासाठी एक भव्य सेटवर बनवला जाणार आहे. ‘अ ह्युमन बीइंग’ स्टुडिओच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मित होणार आहे. तर या चित्रपटाची कथा स्वत: केव्ही विजयेंद्र प्रसाद यांच्या संयुक्त विद्यमानं आलोक देसाई यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे संवाद मनोज मुंटाशीर यांनी लिहिले आहेत. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.
याआधी कंगनाने नुकतेच ‘धाकड’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. कंगना देखील या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. धाकडचे शूटिंग संपल्यानंतर तिने तिचे काही फोटो शेअर केले, जे चाहत्यांना खूप आवडले. मात्र, काही वापरकर्त्यांनी तिच्या बोल्ड चित्रांसाठी तिला ट्रोल केले.
संबंधित बातम्या
मुंबई विमानतळावर दीपिका पादुकोणचा क्लासी अंदाज कॅमेऱ्यात कैद, चाहत्यांना आली रणवीर सिंगची आठवण
लिहिणाऱ्या हातांना सलाम! गणपती उत्सवात प्रवाह परिवारातील 25 लेखकांचा गणरायाची मूर्ती देऊन सन्मान